आयपीएलमध्ये पुनगरागमनासाठी चेन्नई सुपरकिंग्ज सज्ज, धोनी पुन्हा कर्णधार?
आयपीएलमध्ये दोन वर्षे निलंबनाची कारवाई झाल्यानंतर चेन्नई सुपरकिंग्ज आणि राजस्थान रॉयल्स स्पर्धेत पुनगरामनासाठी सज्ज झालेत. चेन्नई सुपरकिंग्जने तर याची तयारीही सुरु केलीये.
नवी दिल्ली : आयपीएलमध्ये दोन वर्षे निलंबनाची कारवाई झाल्यानंतर चेन्नई सुपरकिंग्ज आणि राजस्थान रॉयल्स स्पर्धेत पुनगरामनासाठी सज्ज झालेत. चेन्नई सुपरकिंग्जने तर याची तयारीही सुरु केलीये.
चेन्नई सुपर किंग्जने असा दावा केलाय की, सध्या त्यांच्यासाठी महेंद्रसिंग धोनी मोठे लक्ष्य आहे आणि संघातील त्याची भूमिका महत्त्वाची असेल. जर बीसीसीआय खेळाडूंना संघात कायम ठेवण्यासाठी परवानगी देत असेल तर आम्ही धोनीला संघात कायम ठेवू.
दरम्यान, रायजिंग पुणे सुपरजायंटसोबत करार झाल्यानंतर आम्ही धोनीशी याबाबत चर्चा केलेली नाहीये. मात्र भविष्यात लवकरच संपर्क करु. तसेच आधीचाच सपोर्ट स्टाफ कायम ठेवण्यास आवडेल, असे चेन्नई सुपरकिंग्ज क्रिकेट लिमिटेडचे डायरेक्टर जॉर्ज जॉन म्हणाले.
चेन्नई संघानेही आपल्या टीमचा प्रचार करण्यासही सुरुवात केलीये. ट्विटरवर #CSKReturns हा हॅशटॅग ट्रेंड करतोय. चेन्नई सुपरकिंग्जच्या अधिकृत अकाऊंटवरुन संघाचे जुने फोटोही शेअर करण्यास सुरुवात केलीये.