मुंबई : चुका तर सर्वांकडूनच होतात. परंतु ही चुकी तेव्हा महागात पडते, जेव्हा त्यामुळे कोणाच्या तरी कृत्यावर किंवा आयुष्यावर मोठा परिणाम होतो. अशीच एक मोठी चूक आयपीएल 2021च्या दुसर्‍याच सामन्यात घडली आहे. चेन्नई सुपर किंग्ज आणि दिल्ली कॅपिटल यांमध्ये झालेल्या सामन्यात, ही चूक झाली आहे. महत्वाची गोष्ट तर ही आहे की, ही चूक संघाचा कर्णधार किंवा कोणत्याही खेळाडुकडून झालेली नाही तर, ही चूक चॅनलकडून झाली आहे. ज्या चॅनलकडे BCCI च्या या लीगचे प्रसारण करण्याचे हक्क आहेत, त्याच चॅनलने चूकीचा निर्णय दिला.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आता तुम्ही विचार कराल हे कसं शक्य आहे? चॅनेल कसा काय एखाद्या खेळाडू विरोधात चूक करु शकतो? आणि खेळाडूची मेहनत पाण्यात घालवू शकते? परंतु हेच खरं आहे. आयपीएलचे प्रसारण हक्क असणार्‍या चॅनलने CSK चा खेळाडू रवींद्र जडेजाच्या मेहनतीवर पाणी फेरले आहे.


तिसर्‍या ओवरमधील ही घटना


हे कधी आणि कसे घडले? हे समजून घ्या. तिसरी ओवर चालू असताना ही संपूर्ण घटना घडली. त्यावेळी दीपक चहर बॅलिंग करत होता तर, क्रिकेटचा गब्बर म्हणजेच शिखर धवन हा स्ट्राईकवर होता. चहर दुसरा ओवर टाकत होता आणि त्या ओवरमधील 5 व्या चेंडूवर जे घडले ते सगळ्यांनाच आश्चर्यचकित करणारे होते.


जडेजाच्या मेहनतीवर प्रसारण चॅनलने फेरले पाणी


चहरने 5वा चेंडू गुड लेन्थ लेग कटर टाकला. डाव्या हाताने खेळणाऱ्या  धवनने त्याला आणखी वेगाने मारत बाऊन्ड्री लाईनच्या दिशेने खेळले. चेंडू बाऊन्ड्री लाईनच्या दिशेने जात होता. मात्र जाडेजाने चतुराईने बॅालला ती लाईन ओलांडण्यापूर्वी रोखले. अशाप्रकारे दिल्लीच्या संघाला जिथे 4 रन्स होणार होते तेथे  केवळ 1 रन मिळाला.


आयपीएलच्या या सामन्यात प्रसारण चॅनलला काय झाले माहित नाही परंतु जिथे 1 रन दाखवायला हवा होता तेथे त्याने जडेजाच्या मेहनतीकडे दुर्लक्ष करत 4 रन्स दाखवले. परंतु नंतर आयपीएलच्या या प्रसारण चॅनलला ही चूक करताना पकडले गेले आहे.


अर्थात, चॅनेलच्या या चुकीमुळे संघांच्या परिस्थितीवर परिणाम झाला नाही. पण, चॅनेलच्या अशा चुकांमुळे क्रिकेट चाहत्यांमध्ये संभ्रम निर्माण होऊ शकतो.