IPL 2023 Final : गुजरात की चेन्नई, पाहा कोणाचं पारडं जड? रविवारी रंगणार फायनलचा थरार
CSK vs GT IPL 2023 Final : 28 मे म्हणजेच रविवारी अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर चेन्नई सुपर किंग्ज ( Chennai Super Kings ) विरूद्ध गतविजेती गुजरात टायटन्स ( Gujarat Titans ) यांच्यामध्ये सामना रंगणार आहे. आयपीएल 2023 च्या ट्रॉफीवर कोणती टीम नाव कोरणार हे आता रविवारीच समजू शकणार आहे.
CSK vs GT IPL 2023 Final : गतविजेती गुजरात टायटन्स ( Gujarat Titans ) विरूद्ध 4 वेळा आयपीएल ट्रॉफीवर नाव कोरणाऱ्या चेन्नई सुपर किंग्ज ( Chennai Super Kings ) यांच्यामध्ये आयपीएलचा ( IPL 2023 ) फायनल सामना रंगणार आहे. 28 मे म्हणजेच रविवारी अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर हा सामना रंगणार असून या सामन्यानेत आयपीएलची सांगता होणार आहे. दरम्यान क्वालिफायर 1 मध्ये गुजरात विरूद्ध चेन्नई ( Chennai Super Kings ) एकमेकांशी भिडले होते. त्यामुळे या सामन्यात गुजरात चेन्नईशी ( Chennai Super Kings ) हा बदला घेणार का, हे पहावं लागणार आहे.
फायनलच्या सामन्यात चाहत्यांना धोनी ( MS Dhoni ) विरूद्ध हार्दिक पंड्या ( Hardik pandya ) पहायला मिळणार आहे. मात्र हा सामना अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये रंगणार असल्याने याचा अधिक फायदा गुजरातच्या ( Gujarat Titans ) टीमला मिळणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येतेय. आयपीएल 2023 च्या ट्रॉफीवर कोणती टीम नाव कोरणार हे आता रविवारीच समजू शकणार आहे.
चेन्नई विरूद्ध गुजरात यांचं हेड टू हेड
गुजरात टायटन्स ( Gujarat Titans ) या टीमची एन्ट्री आयपीएलमध्ये गेल्या वर्षी म्हणजे 2022 मध्ये झाली. तेव्हापासून चेन्नई सुपर किंग्जवर गुजरात टायटन्सचं पारडं जड असल्याचं पहायला मिळतंय. आयपीएल मध्ये गुजरात टायटन्स ( Gujarat Titans ) विरूद्ध चेन्नई सुपर किंग्ज ( Chennai Super Kings ) या दोन्ही टीम 5 वेळा आमने - सामने आल्या आहेत. यामध्ये चेन्नई सुपर किंग्जला ( Chennai Super Kings ) केवळ एकदा विजय मिळवणं शक्य झालं आहे. त्यामुळे उद्याचा सामन्यात देखील गुजरात टायटन्स सामना जिंकण्यासाठी दावेदार मानली जातेय.
फायनल सामन्यात पावसाचा खेळ?
मुंबई इंडियन्स ( Mumbai Indians ) विरूद्ध गुजरात टायटन्स ( Gujarat Titans ) यांच्यातील सामन्यात पावसाने व्यत्यय आणला होता. अशा परिस्थितीत फायनलच्या दिवशी पाऊस पडला तर सामना चुरशीचा होण्याची शक्यता आहे. 2022 मध्ये फायनलसाठी रिझर्व-डे ठेवण्यात आला होता. मात्र यंदाच्या वर्षी म्हणजेच 2023 मध्ये कोणताही रिझर्व-डे ठेवण्यात आलेला नाही.
कोणाला मिळणार किती पैसे?
इंडियन प्रीमिअर लीग ही जगातील सर्वात महागडी आणि श्रीमंत क्रिकेट लीग म्हणून ओळखली जाते. यंदा बक्षीसाची एकूण रक्कम 46.5 कोटी रुपये इतकी आहे. विजेत्या संघाला तब्बल 20 कोटी रुपये मिळणार आहेत. तर उपविजेत्या संघाला 13 कोटी रुपये मिळू शकणार आहेत.