मुंबई : आयपीएलचे सामने 26 मार्चपासून सुरू होत आहेत. पहिला सामना चेन्नई विरुद्ध कोलकाता असणार आहे. कोलकाता संघाची धुरा यंदा श्रेयस अय्यरच्या खांद्यावर आहे. गेल्या वर्षी कोलकाता संघाने उत्तम कामगिरी केली. मात्र ट्रॉफीपासून काही पावलं दूर राहावं लागलं होतं. यंदा कोलकाता संघाला ट्रॉफीपर्यंत पोहोचवण्यात श्रेयस अय्यर यशस्वी होणार का? हे पाहाणं महत्त्वाचं ठरणार आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

श्रेयस अय्यर स्वत: चांगल्या फॉर्ममध्ये आहे. मेगा ऑक्शनमध्ये 12.25 कोटी देऊन अय्यरला कोलकाताने आपल्या संघात घेतलं. कोलकाता संघाशी बोलताना श्रेयसने अनेक गोष्टी सांगितल्या आहेत. पहिला सामना 26 मार्च रोजी चेन्नई विरुद्ध कोलकाता होणार आहे. या सामन्यासाठी कोणती आव्हानं असणार इथपासून ते कोलकाताचा मास्टरप्लॅन काय असेल इथपर्यंत अनेक गोष्टी सांगितल्या. 


'मी येणाऱ्या नव्या आव्हानांसाठी तयार आहे. मला तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी करायला आवडते. पण मला असं वाटतं की या स्थानावर फलंदाजी करणं माझ्यासाठी योग्य राहील. पण जिथे माझ्या टीमला आवश्यक आहे त्या क्रमांकावर मी फलंदाजी करण्यासाठी तयार आहे.' श्रेयस अय्यर आपल्या तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी करणाऱ्या स्थानाचं बलिदान देणार का? हे पाहाणं महत्त्वाचं ठरणार आहे. 


कधी मला पावर हिटर व्हावं लागेल तर कधी अँकरची भूमिका निभवावी लागेल. परिस्थितीनुसार मला भूमिका बदलावी लागणार आहे. नव्या आव्हानांसाठी तयार आहे. 


कोलकाता संघ : 
आंद्रे रसेल, वरुण चक्रवर्ती, व्यंकटेश अय्यर, सुनील नरेन, श्रेयस अय्यर, पॅट कमिन्स, अभिजीत तोमर, सॅम बिलिंग्स, एलेक्स हेल्स, रमेश कुमार, मोहम्मद नबी, अमन खान, उमेश यादव, नीतीश राणा, शिवम मावी, शेल्डन जैक्सन, अजिंक्य रहाणे , रिंकू सिंह, अनुकुल रॉय, रसिख डार, चमिका करुणारत्ने, बाबा इंद्रजीत, अशोक शर्मा, प्रथम सिंह