नवी दिल्ली : आयपीएल 2022 च्या सामन्यांना सुरुवात होणार आहे. 26 मार्च रोजी आयपीएलमधील पहिला सामना चेन्नई विरुद्ध कोलकाता होणार आहे. या सामन्यापूर्वी चेन्नई आणि धोनीचं टेन्शन वाढवणारी बातमी आहे. आतापर्यंत धोनीच्या संघाने 4 वेळा आयपीएलची ट्रॉफी आपल्या नावावर केली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

चेन्नई टीमच्या अडचणी कमी होताना दिसत नाहीत. दीपक चाहर, ऋतुराज गायकवाड पाठोपाठ आता आणखी एक स्टार खेळाडू पहिला सामना खेळणार नाही. सुपरस्टार ऑलराउंडर खेळाडूला काही अडचणी असल्याने तात्पुरता संघातून बाहेर झाला आहे. 


पहिल्या सामन्यापूर्वी CSK ला मोठा धक्का
दीपक चाहर पाठोपाठ आता सुपरस्टार ऑलराउंडर मोईन अली संघातून बाहेर झाला आहे. मोईन अलीला भारतात येण्यासाठी काही अडचणी येत असल्याने समस्या निर्माण झाली आहे. त्यामुळे तो पहिला सामना खेळू शकणार नाही. पहिला सामना 26 मार्च रोजी चेन्नई विरुद्ध कोलकाता होणार आहे. 


CSK ने मोईन अलीला 8 कोटी देऊन रिटेन केलं. मोईनला भारतात येण्यासाठी व्हिजा मिळण्यात अडचणी आल्या आहेत. 20 दिवस आधी अर्ज करूनही त्याला भारतात येण्याची परवानगी अजून तिथून मिळाली नाही. 28 फेब्रुवारी रोजी मोईननं व्हिजासाठी अर्ज केला होता. त्यामुळे मोईन CSK च्या कॅम्पमध्ये देखील सहभागी होऊ शकला नाही. 


मोईनने 2021 मध्ये दमदार कामगिरी केली होती. त्याच्या उत्तम कामगिरीनंतर चेन्नईनं त्याला रिटेन करण्याचा निर्णय घेतला. 15 सामन्यात त्याने 357 धावा आणि 6 विकेट्स घेतल्या आहेत. मुंबईचा रेकॉर्ड तोडण्याचा यंदा प्रयत्न चेन्नई करणार आहे. आतापर्यंत मुंबईने 5 वेळा आयपीएलची ट्रॉफी जिंकली आहे. त्यानंतर चेन्नईनं 4 वेळा जिंकली आहे.