CSK vs LSG, IPL 2023: इंडियन प्रीमियर लीग (Indian Premier League) 2023  मध्ये चेन्नईच्या (CSK) संघानं अखेर विजयाचं खातं उघडलं आहे. चेन्नई सुपर किंग्सने (Chennai Super Kings) लखनऊ सुपर जायंट्सचा (Lucknow Super Giants) 12 धावांनी पराभव केला आहे. त्यामुळे चार वर्षानंतर चेपॉकच्या मैदानावर चेन्नईचं चांगभलं झाल्याचं दिसतंय. ऋतुराजची दमदार बॅटिंग आणि मोईन अलीने घेतलेल्या चार विकेटच्या जोरावर सीएसकेने विजयाचा गवासनी घातली आहे. सामना जिंकल्यानंतर मात्र, धोनीचा पारा चढल्याचं दिसून आलं. (CSK vs LSG Match won but Captain Cool MS Dhoni temper rises gives ultimatum to new players latest IPL 2023 News)


काय म्हणाला MS Dhoni?


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आजचा सामना हा उत्कृष्ट झाला. हाय स्कोअरिंग गेम होता. विकेट कशी असेल याचा विचार आम्ही सर्वजण करत होतो. नव्या खेळाडूंना घडू शकणारा हा परिपूर्ण पहिला गेम होता. मला वाटलं की पिच स्लो असेल. पण अशी विकेट होती जिथं तुम्ही धावा करू शकता, असं म्हणत धोनीने (MS Dhoni) आपला अंदाज चुकल्याचं कबूल केलं आहे.


आणखी वाचा - IPL 2023: आयपीएलच्या मध्यातच Rishabh Pant ची एन्ट्री, Delhi Capitals मध्ये आनंदाचं वातावरण!


वेगवान गोलंदाजीमध्ये आम्हाला थोडी सुधारण्याची गरज आहे. परिस्थितीनुसार गोलंदाजी करणं आवश्यक आहे. विरोधी गोलंदाज काय करत आहेत याकडे लक्ष ठेवणं देखील महत्त्वाचं आहे. आणखी एक गोष्ट म्हणजे त्यांना नो-बॉल किंवा अतिरिक्त वाईड टाकणं हे धोक्याचं आहे. खेळाडूंना नवीन कर्णधाराच्या हाताखाली खेळावं लागेल. ही माझी त्यांना दुसरा इशारा असेल आणि नंतर त्यांना इशारा दिला जाणार नाही, असं म्हणत धोनीने नवख्या खेळाडूंना थेट काढून टाकण्याचा अल्टीमेटम दिलाय. 



MS Dhoni चा शेवटचा आयपीएल हंगाम


खेळाडूंना नवीन कर्णधाराच्या हाताखाली खेळावं लागेल, असं धोनी बोलताना म्हणाला. त्यामुळे आता पुढल्या वर्षी धोनी (MS Dhoni Last IPL season) संघात नसणार हे स्पष्ट होत आहे. त्यामुळे आता चेन्नईला नव्या वर्षाच नवा कर्णधार मिळणार आहे. चेन्नईच्या गोलंदाजांनी लखनऊविरुद्धच्या सामन्यात 16 अतिरिक्त रन दिल्या होत्या. त्यामुळे धोनीचा पारा चढल्याचं पहायला मिळालं होतं.