मुंबई : आयपीलच्या 15 मोसमात (IPL 2022) आज दोन कट्टर प्रतिस्पर्धी आमनेसामने उभे ठाकले आहेत. चेन्नई सुपर किंग्स (Chennai Super Kings) विरुद्ध मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) यांच्यात हा प्रतिष्ठेचा सामना खेळवणयात येणार आहे. मुंबईने टॉस जिंकला आहे. कॅप्टन रोहित शर्माने (Rohit Sharma) टॉस जिंकून फिल्डिंगचा निर्णय घेतला आहे. (csk vs mi ipl 2022 mumbai indians win toss and elect to bowling against chennai super kings at mumbai)   


'पलटण'मध्ये मोठे बदल 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मुंबईचं प्लेऑफमधील आव्हान संपुष्टात आलंय. तर चेन्नईसाठी हा 'करो या मरो'चा सामना आहे. चेन्नई विरुद्धच्या सामन्यात मुंबईने प्लेइंग इलेव्हनमध्ये बदल केले आहेत. रोहित शर्माने प्लेइंग इलेव्हनमध्ये अनुभवी फलंदाजांना विश्रांती दिलीय. तर युवा खेळाडूंना संधी दिली आहे. 


बर्थडे बॉय कायरन पोलार्ड या सामन्यात खेळत नाहीये. तर मुरगन अश्विनला बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला आहे.  तर दक्षिण आफ्रिकेचा युवा खेळाडू ट्रिस्टन स्टब्सला संधी देण्यात आली आहे. 


ऋतिक शौकिनचं टीममध्ये पुनरागमन झालंय. तसेच चेन्नईच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नाही.


मुंबई इंडियन्स प्लेइंग इलेव्हन : रोहित शर्मा (कॅप्टन), इशान किशन (विकेटकीपर), तिलक वर्मा, रमनदीप सिंह, ट्रिस्टन स्टब्स, टिम डेविड, डेनियल सॅम्स, ऋतिक शौकीन, जसप्रीत बुमराह, रिले मेरेडिथ आणि कुमार कार्तिकेय. 


चेन्नई सुपर किंग्स प्लेइंग इलेव्हन : ऋतुराज गायकवाड, डेवोन कॉनवे, रॉबिन उथप्पा, अंबाती रायडू, शिवम दुबे, एमएस धोनी (कर्णधार आणि विकेटकीपर), मोईन अली, ड्वेन ब्रावो, मुकेश चौधरी, महेश थीक्षाना आणि  सिमरजीत सिंह.