CSK vs RCB: आयपीएलच्या 17 व्या सिझनला सुरुवात झाली असून पहिल्या सामन्यात चेन्नईने रॉयल चॅलेंजर्स बंगळूरूचा पराभव केला आहे. चेन्नईचा नवा कर्णधार ऋतुराज गायकवाडच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या सीएसकेने आपल्या घरच्या मैदानावर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा 6 विकेट्स राखून पराभव केला. या सामन्यात टाॅस जिंकून प्रथम फलंदाजी करताना आरसीबीने 20 ओव्हर्समध्ये 6 विकेट्स गमावून 173 रन्स केले होते. लक्ष्याचा पाठलाग करताना चेन्नई सुपर किंग्ज संघाने 8 चेंडू बाकी असताना 176 रन्स करून सामना जिंकला.या सामन्यात चेन्नईने आरसीबीचा 6 विकेट्सने पराभव केला आहे. पहिल्याच सामन्यात चेन्नईने विजय मिळवत आयपीएलच्या 17 व्या सिझनचा श्रीगणेशा केला आहे. 


सीएसकेचा 'R' फॅक्टर बंगळूरूवर पडला भारी


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

17 व्या सिझनच्या पहिल्याच सामन्यात चेन्नईचा विजय झाला आहे. यावेळी चेन्नईचा 'R' फॅक्टर बंगळूरूवर भारी पडलेला दिसला. या आर फॅक्टरमध्ये ऋतुराज गायकवाड, रचिन रविंद्र, रहाणे आणि रविंद्र जडेजा यांचा समावेश आहे. या सामन्यात या सर्व खेळाडूंनी चांगली कामगिरी केलेली दिसली.


बंगळूरूने दिलेल्या लक्ष्याचा पाठलाग करताना शिवम दुबे आणि रवींद्र जडेजाने चेन्नई सुपर किंग्जला विजय मिळवून दिला. यावेळी 28 चेंडूंचा सामना करत दुबेने 4 चौकार आणि 1 षटकारासह 34 धावांची नाबाद खेळी खेळली. याशिवाय जडेजाने 17 चेंडूत 25 धावांची नाबाद खेळी करत संघाच्या विजयात महत्त्वपूर्ण योगदान दिलं. ओपनिंगला आलेल्या कर्णधार गायकवाडने 15 रन्स तर, रचिन रवींद्र 15 चेंडूत 37 रन्सची खेळी केली. याशिवाय अजिंक्य रहाणे (27 धावा), डॅरिल मिशेल (22 धावा) बाद झाले.


आरसीबीकडून 174 रन्सचं जिंकण्याचं आव्हान 


फाफ ड्यू प्लेसिसने टॉस जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. यावेळी आरसीबीने सीएसकेला विजयासाठी 174 रन्सचं लक्ष्य दिलं होती. अनुज रावत आणि दिनेश कार्तिक यांनी डाव सांभाळला आणि 78 रन्समध्ये 5 विकेट गमावलेल्या आरसीबी टीमला रूळावर आणलं. या दोघांनी सहाव्या विकेटसाठी 95 रन्सची मोठी भागीदारी केली. यासाठी दोन्ही फलंदाजांनी केवळ 50 बॉल्स खेळले. 


25 बॉल्सचा सामना करताना रावतने 48 रन्सची खेळी केली. यावेळी रावतने 4 फोर आणि 3 सिक्सेस ठोकले. त्याचवेळी दिनेश कार्तिकने 26 बॉल्समध्ये 38 रन्स केले. याशिवाय विराट कोहलीने 21 आणि फाफ डू प्लेसिसने 35 रन्स केले. चेन्नई सुपर किंग्जकडून मुस्तफिजुर रहमानने सर्वाधिक 4 विकेट्स काढल्या.


कशी होती CSK ची प्लेईंग 11


ऋतुराज गायकवाड (कर्णधार), रचिन रवींद्र, अजिंक्य रहाणे, डेरिल मिचेल, रवींद्र जडेजा, समीर रिझवी, महेंद्रसिंग धोनी (यष्टीरक्षक), दीपक चाहर, महेश तीक्ष्णा, मुस्तफिजुर रहमान आणि तुषार देशपांडे.


कशी होती RCB ची प्लेईंग 11


फाफ डु प्लेसिस (कर्णधार), विराट कोहली, रजत पाटीदार, ग्लेन मॅक्सवेल, कॅमरून ग्रीन, दिनेश कार्तिक (यष्टीरक्षक), अनुज रावत, कर्ण शर्मा, अल्झारी जोसेफ, मयंत डागर आणि मोहम्मद सिराज.