`या` खेळाडूला बाहेर बसवणं कॅप्टन धोनीला पडलं महागात, हातून गेली मॅच
आयपीएलचा 49 वा सामना बंगळुरू विरुद्ध चेन्नई झाला. या सामन्यात बंगळुरू टीमने 13 धावांनी धोनीच्या टीमवर विजय मिळवला.
मुंबई : आयपीएलचा 49 वा सामना बंगळुरू विरुद्ध चेन्नई झाला. या सामन्यात बंगळुरू टीमने 13 धावांनी धोनीच्या टीमवर विजय मिळवला. 4 ट्रॉफी मिळवणाऱ्या चेन्नई टीमला यंदाच्या हंगामात मात्र म्हणावं तेवढं यश आलं नाही. 10 पैकी 3 सामने जिंकले तर 7 सामने गमवले आहेत. बंगळुरू विरुद्धचाही सामना गमवण्याची वेळ चेन्नईवर आली.
बंगळुरू विरुद्ध सामन्यात धोनीने सर्वात भरवशाच्या खेळाडूलाच बाहेर बसवलं. ड्वेन ब्रावोला टीममधून खेळण्याची संधी दिली नाही. त्याला हैदराबाद विरुद्ध सामन्यातही बाहेर बसवण्यात आलं होतं. त्याला दुखापत झाल्याने बाहेर बसवलं अशी चर्चा त्यावेळी होती.
ब्रावोचा मधल्या फळीसाठी मोठा हातभार लागला असता अशी चर्चा आहे. त्यामुळे धोनीचा हा निर्णय चुकल्याची चर्चाही सोशल मीडियावर होत आहे.
आयपीएल 2022 मध्ये ब्राव्होची कामगिरीही अप्रतिम राहिली. या मोसमात तो सीएसकेसाठी सर्वाधिक विकेट घेणारा गोलंदाज ठरला आहे. या खेळाडूने केवळ 8 सामन्यात 14 विकेट्स घेतल्या आहेत.
ब्राव्होची टीममध्ये अनुपस्थिती हे सीएसकेच्या पराभवाचे एक मोठे कारण होते कारण शेवटी क्रमवारीत उतरून तो बॅटने सामना संपवू शकला. याचा परिणाम असा झाला की CSK ची मधली फळी RCB विरुद्ध पूर्णपणे फ्लॉप ठरली आणि हा संघ 13 धावांनी सामना हातून गेला.
महेंद्रसिंह धोनी यंदाच्या हंगामात विशेष कामगिरी करताना दिसला नाही. धोनी केवळ 2 धावा करून तंबुत परतला. रविंद्र जडेजाचा फॉर्मही अत्यंत वाईट होता. तोही 3 धावा करून तंबुत परतला. जडेजाला एकही विकेट घेण्यात यश आलं नाही.