मुंबई : चेन्नई विरुद्ध बंगळुरू आज सामना होत आहे. संध्याकाळी 7.30 वाजता या सामन्याला सुरुवात होत आहे. चेन्नईनं चारही सामने गमवले आहेत. तर बंगळुरू टीमने चारपैकी 3 सामने जिंकले तर एक सामना गमवला आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

बंगळुरू टीम पॉईंट टेबलमध्ये तिसऱ्या स्थानावर आहे. चेन्नई मात्र सर्वात खाली आहे. बंगळुरू टीम विजयासाठी आज प्रयत्न करणार आहे. तर पराभवाचं ग्रहण चेन्नईला संपवण्यात यश येणार का? हे पाहावं लागणार आहे. 


चेन्नईचे 2 स्टार खेळाडू असे आहेत जे चेन्नईला विजय मिळवून देऊ शकतात. धोनीव्यतिरिक्त दोन असे खेळाडू आहेत ज्यांनी मनात आणलं तर चेन्नई अख्खा सामना बदलू शकते. हे खेळाडू कोण आहेत जाणून घेऊया.


ऋतुराज गायकवाड- गेल्या तिन्ही सामन्यात ऋतुराज गायकवाड सर्वात मोठा फ्लॉप खेळाडू ठरला. गेल्या हंगामात सर्वात जास्त धावा करणाऱ्या ऋतुराजचा फॉर्म सध्या खराब झाला आहे. अत्यंत वाईट कामगिरी तो करत आहे. त्याची बॅट जर चालली तर चेन्नई टीमला मोठा फायदा होऊ शकतो. गेल्या वर्षीच्या त्याच्या कामगिरीमुळेच चेन्नईनं त्याला रिटेन केलं होतं. 


ड्वेन ब्रावो- ऑलराऊंडर ड्वेन ब्रावोने आयपीएल करिअरमध्ये  173 विकेट्स घेतल्या आहेत. चेन्नईकडून त्याला विकेट घेण्यात यश आलं मात्र त्याने धावाही अधिक दिल्या आहेत. त्यामुळे टीमला मोठा तोटा होत आहे. 


महेंद्रसिंह धोनी - धोनीची बॅट तुफान चालली तर प्रश्नच नाही. तुफान बॅटिंग पाहण्यासाठी चाहते आणि टीममधील खेळाडू उत्सुक आहेत. जर धोनीनं बेस्ट कामगिरी केली तर चेन्नईचा आज विजय निश्चित आहे.