MS Dhoni IPL Record In Marathi: आयपीएल 2024 च्या 17 व्या हंगामातील 46 व्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्जने सनरायझर्स हैदराबादचा पराभव केला. नाणेफेकीचा कौल गमवल्यानंत चेन्नई सुपर किंग्जच्या वाटेल फलंदाजी आली होती. चेन्नई सुपर किंग्जची सुरुवात निराशाजनक झाली. अजिंक्य रहाणे अवघ्या 9 धावांनी आउट झाला. त्यानंतर मात्र ऋतुराज गायकवाड आणि डॅरिल मिशेल यांनी मात्र सामना सावरुन घेतला. या दोघांनी 107 धावपटूंची भागीदारी केली. ऋतुराज गायकवाडने 54 चेंडू, 3 षटकार आणि 10 चौकारांच्या मदतीने 98 धावा केल्या. तर डॅरिल मिशेलने 32 चेंडूत 39 धावा केल्या. त्यानंतर शिवम दुबेने नाबाद 20 आणि 39 धावा आणि धोनीने 2 धावा नाबाद आणि 5 धावा करत धावसंख्या 212 वर नेली. तसेच विजयासाठी 213 धावांचे आवाहन केले. यानंतर खेळीनंतर दुसऱ्या सामन्यात चेन्नईने हैदराबादवर विजय मिळवत मागील पराभवाचा वचपा घेऊन चेन्नईचा हा या हंगामातील पाचवा विजय ठरला. यामुळं चेन्नईनं गुणतालिकेत मोठी झेप घेतली. चेन्नई सुपर किंग्ज गुणतालिकेत तिसऱ्या स्थानावर पोहोचलं असून सनरायजर्स हैदराबादची चौथ्या स्थानावर घसरण झाली. चेन्नईच्या या विजयानंतर महेंद्रसिंगच्या नावावर आयपीएलमधील सर्वात मोठा विक्रम झाला आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

चेन्नई सुपर किंग्ज (CSK) ने सनरायझर्स हैदराबाद (SRH) विरुद्धच्या विजयासह क्रिकेटपटू महेंद्रसिंग धोनीने अनोखा इतिहास रचला आहे. महेंद्रसिंग धोनीने आयपीएलमध्ये मोठा विक्रम केला असून असा विक्रम रोहित शर्मा आणि विराट कोहलीला देखील करता आला नाही. महेंद्रसिंग धोनी आयपीएलमध्ये 150 सामने जिंकणारा हा पहिला क्रिकेटर ठरला आहे. आयपीएलच्या इतिहासात महेंद्रसिंग धोनीने खेळाडू म्हणून सर्वाधिक 150 वेळा विजयाची नोंद केली  आहे.


आतापर्यंतचा महेंद्रसिंघ धोनीचा विक्रम


महेंद्रसिंग धोनी 2008 पासून आयपीएलमध्ये एकूण 259 सामने खेळला आहे. महेंद्रसिंग धोनीने 259 आयपीएल सामन्यांमध्ये 150 विजयांची नोंद केली आहे. महेंद्रसिंग धोनीने 259 आयपीएल सामन्यांमध्ये 39.53 च्या सरासरीने 5178 धावा केल्या आहेत. ज्यामध्ये 24 अर्धशतकांचा समावेश आहे. या काळात त्याची सर्वोत्तम धावसंख्या 84 धावा होती. महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखाली चेन्नई सुपर किंग्जने 5 वेळा आयपीएल ट्रॉफी जिंकली आहे. महेंद्रसिंग धोनी आयपीएल 2024 मध्ये क्रिकेटर म्हणून खेळत आहे. महेंद्रसिंग धोनीने आता चेन्नई सुपर किंग्जचे कर्णधारपद ऋतुराज गायकवाडकडे सोपवले आहे.


IPL 2024 मध्ये धोनी आतापर्यंत नाबाद 


तसेच एमएस धोनी आयपीएल 2024 मध्ये आतापर्यंत नाबादचा ही विक्रम केला आहे, असं म्हणायला वावग ठरणार नाही.  कोणत्याही गोलंदाजाला धोनीची विकेट घेता आली नाही. माहीने आतापर्यंत सात डावांत फलंदाजी केली असून, त्यामध्ये त्याने 259.46 च्या स्ट्राइक रेटने 96 धावा केल्या आहेत. या काळात त्याची सरासरी असीम आहे कारण तो एकदाही बाद झाला नाही. धोनीची सर्वोच्च धावसंख्या 16 चेंडूत 36* धावा होती, जी त्याने या मोसमात प्रथमच फलंदाजी करताना दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध केली होती. आता उरलेल्या सामन्यांमध्ये धोनीची खेळी कशी असणार आहे  हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.  


आयपीएलमध्ये खेळाडू म्हणून सर्वाधिक सामने जिंकण्याचा विक्रम


1. महेंद्रसिंग धोनी – आयपीएलमध्ये 150 विजय


2. रोहित शर्मा - आयपीएलमध्ये 133 विजय


3. रवींद्र जडेजा - आयपीएलमध्ये 133 विजय


4. दिनेश कार्तिक - आयपीएलमध्ये 125 विजय


5. सुरेश रैना - आयपीएलमध्ये 122 विजय