CSKvsRCB Live | चेन्नईला विजयासाठी ७१ रन्सचे माफक आव्हान
बंगळूरु टीमला आतापर्यंत आयपीएलच्या पर्वामधील सलामीची मॅच जिंकता आलेली नाही.
चेन्नई : चेन्नईला बंगळुरुने विजयासाठी ७१ रन्सचे आव्हान दिले आहे. बंगळुरुला २० ओव्हर देखील खेळता आल्या नाही. बंगळुरुला १७.१ ओव्हरमध्ये केवळ ७० रन्स करता आल्या. बंगळुरुकडून सर्वाधिक २९ रन पार्थिव पटेलने केल्या.
चेन्नईने टॉस जिंकून बंगळुरुला बॅटिंग करण्यास भाग पाडले. बॅटिंगसाठी आलेल्या बंगळुरुची निराशाजनक सुरुवात झाली आहे. बंगळुरु टीमला पहिला झटका कॅप्टन कोहलीच्या रुपात लागला. कोहली 6 रनवर कॅचआऊट झाला. कोहली आऊट झाल्यानंतर एकामागे एक बंगळुरुने विकेट गमावले. तगडी बॅटिंगऑर्डर असलेली बंगळुरु टीमचा डाव चेन्नईच्या बॉलिंगपुढे पत्त्यासारखा कोसळला. पार्थिव पटेलचा अपवाद वगळता कोणत्याही खेळाड़ूला दुहेरी आकडा गाठता आला नाही.
चेन्नईकडून हरभजन सिंह आणि इमरान ताहीर या दोघांनी प्रत्येकी 3 विकेट घेतल्या. तर रविंद्र जडेजा २ विकेट घेत उत्तम साथ दिली.
लाईव्ह अपडेट : बंगळुरुला सातवा झटका , नवदीप सैनी २ रन करुन तंबूत
बंगळुरुला पाचवा धक्का ,शिवम दुबे २ रनवर आऊट
बंगळुरुला चौथा धक्का ,शिम्रॉन हेटमायर भोपळा न फोडता माघारी
बंगळुरुला तिसरा झटका, एबी डी व्हिलियर्स ९ रनवर बाद
बंगळुरुने दुसरा विकेट गमावला, मोईन अली ९ रन करुन तंबूत
बंगळुरुने पहिला झटका, कॅप्टन कोहली ६ रन करुन आऊट
चेन्नईने टॉस जिंकून फील्डिंग करण्याचा निर्णय घेत बंगळुरुला बॅटिंग करण्यास भाग पाडले आहे. विराट कोहली आणि महेंद्र सिंह धोनी हे दोन्ही दिग्गज खेळा़डू एकमेकांसमोर उभे ठाकले आहेत. त्यामुळे या मॅचकडे सर्वांचेच लक्ष असणार आहे. ही मॅच चेन्नईतील एम. ए चिदंबरम स्टेडिअममध्ये खेळली जात आहे. चेन्नईचे होम ग्राऊंड असल्याने क्रिकेट चाहत्यांचा मोठ्या प्रमाणावर पाठिंबा असणार आहे.
बंगळूरु टीमला आतापर्यंत आयपीएलच्या पर्वामधील सलामीची मॅच जिंकता आलेली नाही. त्यामुळे पहिली मॅच जिंकून हा विक्रम मोडीत काढण्याचा विचार बंगळूरु टीमचा असेल.
चेन्नई टीम : अंबाती रायुडू, शेन वॉटसन, सुरेश रैना, महेंद्र सिंह धोनी (कॅप्टन), केदार जाधव, रविंद्र जडेजा, ड्वेन ब्राव्हो, दीपक चहर, शार्दुल ठाकूर, हरभजन सिंग, इम्रान ताहीर
बंगळुरु टीम : विराट कोहली (कॅप्टन), पार्थिव पटेल, मोईन अली, शिम्रॉन हेटमायर, एबी डी व्हीलियर्स, शिवम दुबे, कॉलिन डी ग्रँडहोमी, उमेश यादव, युजवेंद्र चहाल, मोहम्मद सिराज, नवदीप सैनी