बर्मिंगहॅम : कॉमनवेल्थ गेम्स स्पर्धतून (Commonwealth Games 2022) भारतासाठी अतिशय आनंदाची बातमी समोर आली आहे. भारताला आणखी एक सुवर्ण पदक (Golden Medle) मिळालं आहे. बर्मिंगहॅम कॉमनवेल्थ गेम्समध्ये कुस्तीपटू बजरंग पुनियाला गोल्ड मेडल (Bajrang Puniya) मिळालं आहे. कुस्तीमध्ये भारताला हे पहिलं सुवर्णपदक मिळालं आहे. (cwc 2022 indian wrestler bajrang pounia beats canadas mcneil lachlan in the mens freestyle 65 Kg weight category final to clinch gold medal)




बजरंगने 65 किलो वजनी गटात हे पदक मिळवलंय. त्याने कॅनडाच्या लचलान मॅकनीलला चितपट केलं. बजरंगने मॅकनीलवर 9-2 असा एकतर्फी विजय मिळवला. विशेष उल्लेखनीय बाब म्हणजे पुनियाची ही लागोपाठ दुसऱ्या कॉमनवेल्थ गेम्समध्ये  सुवर्ण कमाई ठरली आहे.