ICC वर्ल्डकप क्वालीफायर : वेस्ट इंडीजला नमवून अफगाणिस्तानने कायम ठेवले आव्हान...
अफणागणिस्तानने वेस्ट इंडिजला तीन विकेटने पराभूत करून आयसीसी वर्ल्ड कप २०१९ मध्ये आपली जागा कायम करण्याची आशा कायम ठेवली आहे. वेस्ट इंडीजला ५० षटकात आठ विकेटवर १९७ धावेत रोखले. त्यानंतर अफगाणिस्तानने हे लक्ष्य १४ चेंडू बाकी राखत पूर्ण केले. अफगाणिस्तानने सुपर सिक्समध्ये अत्यंत प्रयत्नाने प्रवेश केला होता.
हरारे : अफणागणिस्तानने वेस्ट इंडिजला तीन विकेटने पराभूत करून आयसीसी वर्ल्ड कप २०१९ मध्ये आपली जागा कायम करण्याची आशा कायम ठेवली आहे. वेस्ट इंडीजला ५० षटकात आठ विकेटवर १९७ धावेत रोखले. त्यानंतर अफगाणिस्तानने हे लक्ष्य १४ चेंडू बाकी राखत पूर्ण केले. अफगाणिस्तानने सुपर सिक्समध्ये अत्यंत प्रयत्नाने प्रवेश केला होता.
ग्रुप सामन्यात अफगाणिस्तानला स्कॉटलँड, झिम्बाब्वे, आणि हॉगकाँगकडून पराभवाचे तोंड पाहावे लागले होते. पण त्यांनी नेपाळला नमवत चांगल्या रन रेटच्या जोरावर सुपर सिक्समध्ये जागा बनवली होती. तर वेस्ट इंडिजने आपले सर्व ग्रुप सामने जिंकले होते.
नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा वेस्ट इंडिजचा निर्णय चुकीचा ठरला. चौथ्या षटकात संघाचा स्कोअर १२ असताना क्रिस गेल १ धावेवर क्लिन बोल्ड झाला. गेलने ९ चेंडूंचा सामना केला. मुजीबने त्याला बाद केले. मुजीब आणि गेल दोन्ही भारतात होणाऱ्या आयपीएलच्या किंग्ज इलेवन पंजाबचे सदस्य आहेत.
वेस्ट इंडीजला ५० षटकात आठ विकेटवर १९७ धावाच करता आल्या. तर अफगाणिस्तानने हे लक्ष्य १४ चेंडू बाकी राखत पूर्ण केले. हे पहिल्यांना नाही की अफगाणिस्तानने वेस्ट इंडिजला नमवले आहे. त्यांना अफगाणिस्तानने वॉर्मअप मॅचमध्ये पराभूत केले आहे.