राष्ट्रकुल स्पर्धेत भारताकडून पदकांची बक्कळ कमाई
राष्ट्रकुल स्पर्धेत भारतासाठी आज सोनियाचा दिनू ठरला. भारताने आज 2 सुवर्ण, 2 रौप्य आणि एका कांस्य पदकाची कमाई केली.
सिडनी : राष्ट्रकुल स्पर्धेत भारतासाठी आज सोनियाचा दिनू ठरला. भारताने आज 2 सुवर्ण, 2 रौप्य आणि एका कांस्य पदकाची कमाई केली. वेटलिफ्टिंगमध्ये पूनम यादवने तर 10 मीटर एअर पिस्तुल प्रकारात 16 वर्षीय मनू भाकरने भारतासाठी सुवर्णपदक पटकावलं आहे. वेटलिफ्टिंगमध्ये पूनम यादवने सुवर्णपदक पटकावलंय. 69 किलो वजनी गटात पूनमने ही सुवर्ण कामगिरी करुन दाखवलीय. तर 10 मीटर एअर पिस्तुल प्रकारात हिना सिद्धूनेही रौप्य पदक जिंकण्याची किमया साधली आहे.
विकास ठाकूरला 94 किलो वजनी गटात कांस्य पदक
वेटलिफ्टींगमध्ये भारताच्या विकास ठाकूरने 94 किलो वजनी गटात कांस्य पदक पटकावलं. तर भारताच्या रवी कुमारने 10 मीटर एअर रायफल प्रकारात कांस्य पदक जिंकलं.
राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत आतापर्यंत ६ सुवर्णपदकांची कमाई
पूनम, मनूच्या या सुवर्णपदकामुळे भारताने राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत आतापर्यंत सहा सुवर्णपदकांची कमाई केलीय. सहापैकी चार सुवर्णपदके ही महिलांनी जिंकली आहेत. दुसरीकडे महिला बॉक्सिंगमध्ये मेरी कोमने उपांत्य फेरीत धडक मारलीय. त्यामुळे भारताचं आणखी एक पदक निश्चित मानलं जातंय.