Video : डॅडाला कोरोना झालाय...; Rohit Sharma ची लेक samaira च्या बोबड्या बोलाने जिंकली सर्वांची मनं!
रोहित शर्मा 1 जुलैपासून खेळल्या जाणाऱ्या टेस्ट सामन्यात खेळणार की नाही हे आतापर्यंत मॅनेजमेंटने स्पष्ट केलं नाही.
मुंबई : क्रिकेट टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्माची नुकतीच कोरोना टेस्ट पॉझिटीव्ह आली आहे. कोरोनाची लागण झाल्याने त्याचे चाहते खूप चिंतेत आहेत. रोहित शर्मा 1 जुलैपासून खेळल्या जाणाऱ्या टेस्ट सामन्यात खेळणार की नाही हे आतापर्यंत मॅनेजमेंटने स्पष्ट केलं नाही.
अशातच रोहितची मुलगी समायराचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होतोय. या व्हिडिओमध्ये ती आई रितिका आणि नॅनीसोबत हॉटेलमधून बाहेर पडताना दिसतेय. यावेळी तिला रोहितबाबत असलेल्या काळजीसंदर्भात तिचं फारचं कौतुक केलं जातंय.
यादरम्यान समायरा हॉटेलच्या बाहेर पडण्याच्या मार्गाजवळ पोहोचताच बाजूला बसलेल्या कोणीतरी समायराला प्रश्न विचारला, की तुझे बाबा कुठे आहेत?
यावर फार प्रेमळपणे उत्तर देताना म्हणते, तो त्याच्या खोलीत आहे. डॅडा कोरोना पॉझिटीव्ह आहे. त्यामुळे एकच व्यक्ती त्याच्यासोबत थांबू शकते.
समायराच्या या निरागस व्हिडीओने सोशल मीडियावर लोकांची मनं जिंकली आहेत. चाहते त्याला लाइक आणि शेअर करत आहेत. समायराचा हा व्हिडीयो सोशल मीडियावर चांगला व्हायरल झाला आहे.