Team India चा `युवराज सिंह` कोण? `या` खेळाडूकडे 6 बॉलवर 6 सिक्स मारण्याची ताकद!
Team India भारतीय संघाला मिळाला नवा युवराज सिंह
Sanju Samson : भारत आणि साऊथ आफ्रिकामध्ये (IND vs SA ODI) एकदिवसीय मालिका खेळली जात आहे. या मालिकेतील पहिल्या सामन्यात दक्षिण आफ्रिकेने भारताचा 9 धावांनी पराभव केला. अखेरच्या षटकापर्यंत रंगलेल्या या सामन्यात संजू सॅमसनने भारताला सामना जिंकवून देण्याचा प्रयत्न केला. मात्र, अखेर टीम इंडियाला (Team India) पराभवाला सामोरं जावं लागलं. (Sanju Samson have capability like Yuvraj Singh)
टीम इंडियाला जिंकण्यासाठी अखेरच्या षटकात 30 धावांची गरज होती. मात्र, संजूने अखेरच्या षटकात 3 फोर आणि 1 सिक्स मारत 20 धावा केल्या. संजूने शेवटच्या ओव्हरच्या पहिल्या चेंडूवर षटकार खेचला. त्यामुळे संजू मॅच जिंकवतोय की काय, असं सर्वांनाच वाटलं. अशातच आता T20 World Cup पूर्वी दक्षिण आफ्रिकेचा माजी स्टार गोलंदाज स्टेनगन म्हणजेच डेल स्टेनने (Dale Steyn) मोठं वक्तव्य केलं आहे.
काय म्हणाला Dale Steyn -
डेल स्टेनने एका मुलाखतीमध्ये बोलताना संजू सॅमसनचं (Sanju Samson) कौतूक केलंय. पहिल्या वनडेमध्ये जेव्हा रबाडाने शम्सीकडे बॉल दिला. त्यावेळी मी नाराज झालो, कारण संजू सॅमसन एक असा खेळाडू आहे, ज्याच्याकडे युवराज सिंह (Yuvraj Singh) सारखी क्षमता आहे, असं डेल स्टेन म्हणाला. प्रत्येत बॉलवर सिक्स खेचण्याची क्षमता संजूकडे आहे. तो भारताचा विजयी करू शकला असता, असा विश्वास डेल स्टेनने व्यक्त केला आहे.
शेवटच्या ओव्हरवर Sanju Samson काय म्हणाला?
आफ्रिकेच्या चांगल्या बॉलिंगपैकी शम्सीची (Shamsi) ओव्हर सर्वात वाईट जात होती, हे मला माहिती होतं. मला माहिती होतं की, शम्सीची एक ओव्हर राहिली आहे. अखेरच्या ओव्हरला जर 24 धावांची गरज असती तर मी सामना जिंकवून देऊ शकलो असतो, त्याप्रमाणे आमची प्लानिंग होती, असं संजू म्हणाला होता.