IND vs SA: Omicronचा धोका; दौऱ्याबाबत BCCI काय घेणार निर्णय?
मुंबईमधील न्यूझीलंडविरूद्धची दुसरी कसोटी संपताच भारतीय टीमला दक्षिण आफ्रिकेला रवाना व्हायचं आहे.
मुंबई : टीम इंडियाचा या महिन्यात होणारा दक्षिण आफ्रिका दौरा आठवडाभर उशिरा सुरू होऊ शकतो. कोविड-19 चा नवा व्हेरिएंट 'ओमायक्रोन' प्रथम दक्षिण आफ्रिकेत आढळला. या देशात कोविड-19 ची प्रकरणं वेगाने वाढताना दिसतायत. हीच गोष्ट लक्षात घेऊन बीसीसीआयने या दौऱ्यावर विचार करण्यासाठी काही वेळ मागितला आहे.
भारतीय संघ सध्या न्यूझीलंडविरुद्ध मायदेशात कसोटी मालिका खेळत आहे. मुंबईमधील दुसरी कसोटी संपताच भारतीय टीमला दक्षिण आफ्रिकेला रवाना व्हायचं आहे.
याआधी, दक्षिण आफ्रिका सरकारमधील परराष्ट्र मंत्री भारतीय संघाला पूर्णपणे सुरक्षित बायो-सिक्युर वातावरण देतील. सध्या भारतीय 'अ' संघ पहिल्या दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर आहे. न्यूझीलंडविरुद्धच्या कसोटी मालिकेनंतर टीम इंडियाला 9 डिसेंबरला दक्षिण आफ्रिकेला रवाना होणार आहे. या मालिकेतील पहिला सामना 17 डिसेंबरपासून सुरू होणार आहे.
या दक्षिण आफ्रिकेच्या भारत दौऱ्यात 3 कसोटी, 3 एकदिवसीय आणि 4 टी-20 सामने खेळवले जाणार आहेत. पहिली कसोटी 17 डिसेंबरपासून जोहान्सबर्ग येथे खेळवली जाणार आहे. बीसीसीआयसोबतच भारत सरकारही सध्याच्या परिस्थितीवर लक्ष ठेवून आहे.
काय म्हणाले भारताचे क्रीडा मंत्री?
भारताचे क्रीडा मंत्री अनुराग ठाकूर यांनी बागपतमध्ये एएनआयला सांगितलं की, "फक्त बीसीसीआयच नाही तर सर्व बोर्डांनी भारत सरकारशी संपर्क साधावा जे त्यांचा संघ अशा देशात पाठवत आहेत जिथे कोविड -19 चा नवा व्हेरिएंट सापडला आहे. अशा परिस्थितीत जिथे धोका आहे अशा देशांमध्ये टीम पाठवण्याची ही योग्य वेळ नाही. बीसीसीआयने आमच्याशी संपर्क साधल्यास आम्ही त्यावर विचार करू."