मुंबई : क्रिकेटमध्ये अस काही क्रिकेटर आहेत ज्यांनी मृत्यूला अगदी जवळून पाहिलं आहे. या क्रिकेटपटूंना नशिबाची साथ मिळाली म्हणून आज आपण त्यांना राहू शकतो. भीषण अपघातातून या क्रिकेटपटूंचं प्राण बचावले आहेत. चला या क्रिकेटर्सवर एक नजर टाकूया-


मोहम्मद शमी


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

भारतीय क्रिकेट टीमचा स्टार गोलंदाज मोहम्मद शमीचं 2018 मध्ये देहरादूनला कार अपघात झाला होता. या अपघातात शमीला उजव्या डोळ्याच्या वर दुखापत झाली होती. यावेळी त्याच्या डोक्याला टाकेही पडले होते. यातून सुखरूपरित्या बाहेर पडत त्याने मैदानावर उत्तमरित्या पुनरागमन केलं होतं.


करूण नायर


टेस्ट टीममध्ये त्रिशतक झळकवण्याचं काम करणाऱ्या करूण नायरचं 2016 मध्ये केरळला सुट्टी एन्जॉय करण्यासाठी गेला होता. तो आपल्या नातेवाईकांसोबत पम्पा नदीतून एका बोटीद्वारे अरनमुला मंदिरात जात होता. यावेळी बोटीचा अपघात झाला. त्यावेळी करूणला काही अंतर पोहत किनाऱ्यावर यावं लागलं होतं.


ओशाने थॉमस


वेस्ट इंडीजचा वेगवान गोलंदाज ओशने थॉमसचा फेब्रुवारी 2020 मध्ये जमैका याठिकाणी मोठा अपघात झाला होता. या अपघातात थॉमसची कार पूर्णपणे पलटली आणि त्याला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. त्यावेळी डॉक्टरांनी ओशने थॉमसला घरी विश्रांती घेण्याचा सल्ला दिला होता. बरा झाल्यानंतर तो क्रिकेटच्या मैदानावर परतला.


निकोलस पूरन


निकोलस पूरन हा वेस्ट इंडीज क्रिकेट टीमचा भविष्य म्हणून पाहिले जाते. जानेवारी 2015मध्ये निकोलस पूरनचा अपघात झाल्यानंतर तो चालण्यासही सक्षम नव्हता. त्रिनिदाद येथे निकोलस पूरन अपघातात जखमी झाला होता. त्यानंतर त्वरित त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आलं. त्यावेळी त्याच्या दोन्ही पायांवर शस्त्रक्रिया करण्यात आली होती.