सिडनी : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील पहिल्या टी-२० सामन्यात टीम इंडियाचा खेळाडू रवींद्र जडेजा गंभीर जखमी झाला आहे. शेवटच्या ओव्हरमध्ये मिचेल स्टार्कचा बाउन्सर बॉल जडेजाच्या डोक्यावर लागला. तो सामन्यातून बाहेर झाला आहे. त्याच्या जागी युजवेंद्र चहलचा सामन्यात समावेश केला गेला आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

जडेजाची दुखापत किती गंभीर आहे याबद्दल कोणतीही अधिकृत माहिती नाही, परंतु सामन्याबाहेर गेल्यामुळे संघाचे खेळाडू चिंताग्रस्त आहेत. सामन्यादरम्यान जडेजाने चांगली कामगिरी केली. संघाला 161 धावांपर्यंत त्याने पोहोचवलं. ऑस्ट्रेलियाचा डाव सुरू होण्यापूर्वी युजवेंद्र चहल जडेजाऐवजी टीमध्ये आला आहे.


जडेजाच्या जागी चहलचा संघात समावेश केल्याबद्दल ऑस्ट्रेलियाकडून आक्षेप घेण्यात आला. ऑस्ट्रेलियाचे प्रशिक्षक जस्टिन लॅंगर आणि कर्णधार मॅच रेफरीशी वाद घालताना दिसले. दुखापतीनंतरही जडेजाने डाव पूर्ण केला आणि त्याकडे पाहिलं असता तो असहज दिसत नव्हता. असं ही म्हटलं आहे.


भारतीय डाव कोसळल्यानंतर रवींद्र जडेजाने एक अतुलनीय डाव खेळला. ज्याने भारताला सामन्यात परत आणले. जडेजाने अवघ्या 23 चेंडूत 44 धावा फटकावल्या. यादरम्यान त्याने 5 फोर आणि एक सिक्स लगावला.