Danish Kaneria on PCB Chief : पाकिस्तान येत्या 2023 च्या आशिया चषकाचं नियोजन पाकिस्तानला करायचं आहे. मात्र बीसीसीआयचे सचिव जय शहा यांनी टीम इंडिया आशिया चषक खेळण्यासाठी जाणार नसल्याचं म्हटलं आहे. मात्र यावर पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे अध्यक्ष रमीझ राजा यांनी म्हटलं आहे की, जर टीम इंडिया आशिया चषक खेळण्यासाठी पाकिस्तानमध्ये आली नाही तर पाकिस्तानी संघही विश्वचषक खेळण्यासाठी भारतात जाणार नाही. यावरून आता पाकिस्तानचा माजी खेळाडू दानिश कनेरियाने रमीज राजा यांना फटकारलं आहे. (danish kaneria on pcb chief ramiz raja to go in india odi world cup 2023 asia cup pakistan cricket team bcci latest marathi Sport news)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पाकिस्तानचा माजी स्टार खेळाडू दानिश कनेरिया त्याच्या यूट्यूब चॅनलवर म्हणाला, पीसीबीमध्ये आयसीसी स्पर्धेवर बहिष्कार टाकण्याचे धाडस नाही. पाकिस्तान भारतात गेला नाही तर भारताला काही फरक पडणार नाही. बीसीसीआय आयसीसीला 90 टक्के महसूल देतात. त्यांच्याकडे कमाईची अनेक साधने आहेत. आयपीएलची तुलना जगातील मोठ्या लीगशी केली जात आहे. भारतात न गेल्यास पाकिस्तानचंच नुकसान होईल, असं दानिश कनेरियाने म्हटलं आहे.  


पाकिस्तानी संघ अखेर विश्वचषकासाठी भारतात जाणारा यावर अधिकारी सांगणार की,  त्यांच्याकडे पर्याय नव्हता कारण आयसीसीच्या दबावाखाली भारत दौरा करावा लागला, असंही कनेरियाने म्हणाला. त्यामुळे या वादाचं पुढे काय होणार भारतीय संघ पाकिस्तानमध्ये जाणार नाही हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.


 



दानिश कनेरियाची गणना पाकिस्तानच्या सर्वोत्तम गोलंदाजांमध्ये केली जाते. त्याने पाकिस्तान संघासाठी अनेक सामने स्वबळावर जिंकले आहेत. 61 कसोटी सामन्यात 261 विकेट घेतल्या आहेत. त्याचबरोबर त्याने 18 एकदिवसीय सामन्यांमध्ये 15 विकेट घेतल्या आहेत.