मुंबई : आयपीएलच्या पंधराव्या हंगामात दोन नव्या टीमने धुमाकूळ घातला आहे. नवे आहेत पण छावे आहेत असं म्हणायला हवं. राजस्थान विरुद्ध झालेल्या सामन्यात गुजरात टीमने विजय मिळवला आहे. गुजरातकडे आता ट्रॉफी विनर म्हणून पाहिलं जात आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

दक्षिण आफ्रिकेचा फलंदाज या मॅचनंतर चांगलाच चर्चेत आला आहे. डेविडने 38 बॉलमध्ये 68 धावांची खेळी केली आणि गुजरातला विजय मिळवून दिला. शेवटच्या ओव्हरमध्ये त्याने 3 षटकार ठोकले. 


सामना संपल्यानंतर डेविड मिलरने माफी मागितली. त्यामुळे मिलरची चर्चा होत आहे. डेविड मिलरने ट्वीट करून राजस्थान टीमची माफी मागितली. मिलर गेल्या दोन हंगामात राजस्थान टीमकडून खेळला होता. त्यामुळे त्याने ट्वीट करून सॉरी रॉयल फॅमेली असं ट्वीट केलं. 




मिलरचं हे ट्वीट सोशल मीडियावर तुफान चर्चेत आलं. यंदाच्या हंगामात मिलर गुजरात टीममधून खेळताना दिसला. मिलर राजस्थानकडून एवढं चांगलं खेळू शकला नाही. मात्र गुजरात टीमकडून खेळताना त्याने दमदार कामगिरी केली आणि राजस्थानला जिंकवून दिलं. मिलरचे ट्वीट आणि त्यावरचे मीम्स सोशल मीडियावर खास चर्चेचा विषय ठरले.