मुंबई : ऑस्ट्रेलिया क्रिकेट टीम सध्या पाकिस्तानच्या दौऱ्यावर आहे. पाकिस्तान आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात तिसरा टेस्ट सामना सुरु आहे. दरम्यान या सामन्यात ऑस्ट्रेलियाचा डेव्हिड वॉर्नर आणि पाकिस्तानचा शाहीन आफरीदी यांच्यात छोटी बाचाबाची झाली. तर सामन्याच्या चौथ्या दिवशी वॉर्नची फिल्डवर अंपायरशी शाब्दिक बाचाबाची झाल्याचं दिसून आलं. यावेळी वॉर्नर प्रचंड संतापला होता.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

ऑस्ट्रेलियाच्या डावात 21 व्या ओव्हरमध्ये हा सर्व प्रकार घडला. अंपायर अलीम डार आणि अहसान रजा ओव्हर संपल्यानंतर वॉर्नरकडे आले. यावेळी त्यांना वॉर्नला वॉर्निंग देत शॉर्ट नंतर पिचच्या डेंजर एरियामध्ये न जाण्याचा सल्ला दिला. यावर डेव्हिड वॉर्नर फार वैतागला आणि भर मैदानात अंपायरवर भडकला. 


स्टंप माईमकमध्ये वाद झाला रेकॉर्ड


अंपायरने वॉर्निंग दिल्यानंतर डेव्हिड वॉर्नर फार वैतागला. त्याच्या मताप्रमाणे, त्याने कोणतीही चूक केली नव्हती. यावेळी वॉ़र्नरने अंपायरला नियमांचं पुस्तक दाखवा असंही म्हटलं. मुख्य म्हणजे वॉर्नर त्याच्या क्रीजपासून थोडा पुढे आला होता. याबाबत अंपायरने त्याला इशारा दिला. यादरम्यान वॉर्नर आणि पंच यांच्यातील संपूर्ण वादविवाद स्टंपमध्ये लावलेल्या माईकमध्ये रेकॉर्ड झाले.


अंपायर अहसान रजा म्हणाले, 'तुला या ठिकाणहून हटावं लागेल.' अंपायरचं हे ऐकून वॉर्नर संतापला आणि म्हणाला, 'मला नियमांचं पुस्तक दाखवा. जोपर्यंत तुम्ही मला दाखवत नाही तोपर्यंत मी खेळ सुरू करणार नाही.



थोडा वेळ खेळ थांबल्यानंतर पुन्हा सामना सुरू झाला. यादरम्यान डेव्हिड वॉर्नर पाकिस्तानी क्रिकेट टीमचा कर्णधार बाबर आझमशी बोलताना दिसला. त्यानंतर काही वेळात पुन्हा खेळ सुरू झाला.