David Warner Baggy Green Cap Stolen : ऑस्ट्रेलिया आणि पाकिस्तान यांच्यातील अखेरचा कसोटी सामना (Australia vs Pakistan) खेळणाऱ्या डेव्हिड वॉर्नरने एकदिवसीय क्रिकेटमधूनही निवृत्ती जाहीर केली आहे. त्यामुळे एका दिग्गज खेळाडूला कसोटी खेळताना (Farewell Test in Sydney) पाहण्याची शेवटची संधी क्रिकेट फॅन्सकडे आहे. अशातच आता अखेरच्या सामन्याआधी धक्कादायक घटना समोर आली आहे. मेलबर्नहून सिडनीला जात असताना मौल्यवान वस्तूंनी भरलेली बॅग बेपत्ता झाल्याची माहिती डेव्हिड वॉर्नरने (David Warner) दिली आहे. एक व्हिडीओ शेअर करत वॉर्नरने भावूक आवाहन देखील केलंय.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

काय म्हणाला David Warner ?


नमस्कार, हा माझा शेवटचा उपाय आहे पण माझी बॅगी ग्रीन कॅप असलेली माझी बॅकपॅक गहाळ झाली आहे. टीम हॉटेल आणि क्वांटासमधील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी केली आहे. दुर्दैवाने कोणीतरी सामानातून माझी बॅग काढली होती, ज्यामध्ये माझी कसोटीची टोपी आणि माझ्या मुलींच्या भेटवस्तू होत्या. या गोष्टी माझ्यासाठी भावनिक आहे, मला माझ्या हातात परत घ्यायला आवडेल. माझ्याकडे येथे एक अतिरिक्त बॅग आहे. तुम्हाला कोणत्याही अडचणीत येणार नाही. तुम्ही माझी टोपी परत केलीत तर मला ती तुम्हाला देण्यात आनंद होईल, असं डेव्हिड वॉर्नर म्हणाला आहे. 


अचानक वनडे क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतर वॉर्नरने आपल्या भावना व्यक्त केल्या होत्या. त्यावेळी त्याने सँडपेपर गेट प्रकरणावर (Sandpaper Gate scandal) देखील भाष्य केलं होतं. मला कोणताही पश्चाताप होत नाही. कारण जेव्हा तुम्ही पुढे जाल तेव्हा तुम्हाला अनेक अडथळ्यांचा सामना करावा लागेल. वाटेत अडथळे येतील पण तुम्हाला पुढं जायचं आहे आणि मी ते सन्मानानं केलंय, असं वॉर्नर म्हणाला होता. तर आयपीएलमध्ये सनरायझर्स हैदराबाद आणि दिल्ली कॅपिटल्सचे नेतृत्व करणाऱ्या वॉर्नरने सांगितलं की, मला टी-20 लीगमध्ये नेतृत्व करताना आनंद झाला. मी माझ्या नेतृत्वाच्या भूमिकेचा आनंद लुटला आहे. नेतृत्व म्हणजे कर्णधार किंवा उपकर्णधार होणं नाही. माझ्यासाठी मी या संघाचे नेतृत्व करतो, असंही वॉर्नर निवृत्तीपूर्वी म्हणाला आहे.


आणखी वाचा - "मला कसलाच पश्चाताप नाही...", बॉल टॅम्परिंग प्रकरणावर David Warner स्पष्टच बोलला, म्हणतो 'आयपीएलमध्ये माझ्यावर...'


दरम्यान, डेव्हिड वॉर्नरने (David Warner) टी-20 क्रिकेटवर लक्ष केंद्रित करण्यासाठी कसोटी आणि एकदिवसीय क्रिकेटमधून निवृत्ती घेण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे आता आगामी टी-ट्वेंटी क्रिकेटमध्ये डेव्हिड वॉर्नर खेळणार की नाही? असा सवाल विचारला जातोय.