अबू धाबी : इंडीयन प्रिमियर लीगमध्ये सर्वात यशस्वी विदेशी फलंदाज डेव्हिड वॉर्नर यंदा देखील रन्सचा पाऊस पाडतोय. ऑस्ट्रेलियाचा सलामी फलंदाज वॉर्नरने विराट कोहलीचा सर्वाद जलद रन्स बनवण्याचा रेकॉर्ड आपल्या नावावर केलाय. सनरायजर्स हैदराबादचा कॅप्टन वॉर्नरने कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध खेळलेल्या मॅचमध्ये हा विक्रम करुन दाखवला. आयपीएलच्या इतिहासात ५ हजार रन्स बनवणारा डेव्हिड वॉर्नर हा चौथा खेळाडू आहे. त्याने १३५ आयपीएल मॅचमध्ये हा रेकॉर्ड आपल्या नावे केलाय. रॉयल चॅलेंजर्स बंगळूरचा कॅप्टन कोहलीने ५ हजारचा टप्पा गाठण्यासाठी  १५७ मॅच खेळल्या. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

डेविड वॉर्नर आयपीएलचा सर्वात यशस्वी फलंदाज राहीला आहे. जगातील सर्वात मोठ्या टी २० लीगमध्ये वॉर्नर यशस्वी विदेशी फलंदाज आहे. आयपीएलमधील आपला धावफलक उंचावण्यासाठी वॉर्नरचे लक्ष्य आज ५ हजार रन्सवर आहे. 


५ हजारचा टप्पा पार करणारा वॉर्नर चौथा बॅट्समन ठरलाय. आयपीएलमध्ये सर्वात जास्त रन्स विराट कोहलीच्या नावावर आहेत. कोहलीने टुर्नामेंटमध्ये ५,६६८ रन्स बनवले आहेत.



वॉर्नर हा आयपीएलमधील यशस्वी ओपनर आहे. वॉर्नरने ऑरेंज कॅप सर्वाधिक तीन वेळा जिंकली आहे. २०१५, २०१७ आणि २०१९ मध्ये वॉर्नरने हे यश मिळवलं. या लीगमध्ये सर्वाधिक ४६ फिफ्टी वॉर्नरच्या नावावर आहेत.  


वॉर्नरची टीम हैदराबादने आयपीएल १३ मझ्ये ९ मॅचमधील तीन मॅच जिंकल्या आहेत. टीमची पुढची मॅच राजस्थान रॉयल्ससोबत गुरुवारी असणार आहे.