दुबई : ऑस्ट्रेलियन खेळाडू डेव्हिड वॉर्नर सनरायझर्स हैदराबाद सोडणार अशा चर्चा सुरु आहेत. इंडियन प्रीमियर लीग 2021 च्या दुसऱ्या सत्रात, डेव्हिड वॉर्नरला प्लेइंग 11 मध्ये स्थान मिळालं नाही, तेव्हापासून अशी अटकळ बांधली जात होती. अलीकडेच, ऑस्ट्रेलियन दिग्गजाने त्याच्या इंस्टाग्रामवर एक भावनिक पोस्ट टाकून या अनुमान सत्य असल्याचे संकेत दिलेत.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पण आता असाच आणखी एक वाद निर्माण झाला आहे जो सूचित करतो की डेव्हिड वॉर्नर आणि सनरायझर्स हैदराबाद यांची वाट वेगळी होणार आहे. शुक्रवारी, मुंबई इंडियन्सच्या सनरायझर्स हैदराबादने आपला शेवटचा साखळी सामना खेळला, संघ आधीच प्लेऑफच्या शर्यतीतून बाहेर होता. 


या सामन्यानंतर सनरायझर्स हैदराबादने त्यांच्या इन्स्टाग्रामवर एक व्हिडिओ पोस्ट केला, ज्यात टीमचा कर्णधार केन विल्यमसन सोबत इतर कोचिंग स्टाफ आणि वरिष्ठ सदस्य होते. पण डेव्हिड वॉर्नर त्यात दिसला. जेव्हा चाहत्यांनी याविषयी डेव्हिड वॉर्नरला प्रश्न विचारला तेव्हा त्याने उत्तर दिलं की मला हे करण्यास सांगितलंच नव्हतं.



डेव्हिड वॉर्नरने असंही म्हटले की, तो आता एका वेगळ्या हॉटेलमध्ये राहतोय. प्लेइंग 11मध्ये डेव्हिड वॉर्नरचा समावेश न केल्याने चाहते आधीच टीमवर संतापले होते आणि सतत विरोध होत होता. पण आता अशा प्रकारच्या वागण्याने फॅन्स अधिक दुखावले आहेत.


सनरायझर्ससोबत वॉर्नरचा प्रवास


डेव्हिड वॉर्नरचं नाव मॉडर्न टाइम ग्रेट प्लेयर्समध्ये घेतलं जातं. त्याने आयपीएलमध्येही सातत्याने चांगली कामगिरी केली आहे. 2014 ते 2020 पर्यंत, डेव्हिड वॉर्नरने प्रत्येक हंगामात 500 पेक्षा जास्त धावा केल्या आहेत. फक्त 2021 च्या हंगामात, डेव्हिड वॉर्नर 8 सामन्यांत फक्त 195 रन्स करू शकला. अशा परिस्थितीत, हैदराबाद संघासाठी डेव्हिड वॉर्नरचा हा शेवटचा सिझन असल्याची चिन्हं बऱ्याच काळापासून होती.