Australia vs England: इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया यांच्यामध्ये 3 सामन्यांची वनडे सिरीज खेळवली जातेय. या सिरीजमधील पहिला सामना एडिलेड ओव्हलवर खेळवण्यात आलाय. दरम्यान या सामन्यात खेळाव्यतिरीक्त डेव्हि़ वॉर्नरचा एक व्हिडीओ तुफार व्हायरल होताना दिसतोय. यामध्ये वॉर्नर त्याच्या एका छोट्या चाहत्यासोबत मस्ती करताना दिसतोय.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या व्हिडीओमध्ये वॉर्नर छोट्या चाहत्यासाठी कागदाच्या तुकड्यावर मेसेज लिहतो. इतकंच नाही तर लाईव्ह सामन्यात हा कागदाचा तुकडा घेऊन तो पव्हेलियनमध्ये बसला होता. 


सामना पहायला आलेल्या एका छोट्या चाहत्याच्या हातात एक कागद होता. या कागदावर लहानग्या मुलाने लिहिलं होतं की, डेविड वॉर्नर मला तुझं शर्ट मिळू शकतं का? याच दरम्यान डगआऊटमध्ये बसलेल्या वॉर्नरकडे कॅमेरा जातो आणि ही गोष्ट त्याच्यापर्यंत पोहोचते.



या लहान मुलाची मागणी पाहून हसतो. यावेळी इतर खेळाडू वॉर्नरशी मजा मस्करी करत असतात. यावेळी एक खेळाडू डेविड वॉर्नरचा शर्ट काढून देण्याचाही प्रयत्न करतो. यावेळी वॉर्नर इशाऱ्यामध्ये, शर्टच्या आत काही घातलं नसल्याचं गमतीने सांगतो. 


थोड्यावेळाने वॉर्नरकडे पुन्हा कॅमेरा जातो. यावेळी त्याच्या हातात एक कागदाचा तुकडा असतो, द्यावर लिहिलं असतं की, 'मार्नस लाबुशेनकडून शर्ट घे'. यानंतर तो लहान मुलगा अजून एक कागद दाखवतो, ज्यावर लिहिलं असतं की, मार्नस प्लीज मला तुझं शर्ट मिळेल का? हा प्रकार वाचून मार्नस लाबुशेन आणि वॉर्नर दोघंही हसू रोखू शकत नाहीत.