सिडनी :  भारताशी झालेल्या वनडे आणि टी-२० सिरीजनंतर ऑस्ट्रेलियाचा संघ मायदेशी परतला. पण या संघाचा उपकर्णधार डेव्हिड वॉर्नर आपल्या कुटुंबाच्या सुरक्षेविषयी चिंतीत आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

वॉर्नरच्या कुटुंबाचा कोणीतरी पाठलाग करत आहे आणि त्यामुळे वॉर्नर हैराण झाला आहे. वॉर्नरने आपल्या इन्स्टाग्रामवर एक फोटो शेअर केला त्यात आपली तक्रार नोंदवली आहे. वॉर्नर सोशल मीडियावर या गोष्टीची माहिती आपल्या फॅन्सला दिली आहे. वॉर्नरचे म्हणणे आहे, मला भीती वाटतते की कोणीतरी माझ्या कुटुंबावर नजर ठेऊन आहे. 


पुढील महिन्यात इंग्लंडसोबत अॅशेज सिरीज असल्याने तो आपल्या कुटुंबासोबत काही काळ घालवत आहे. त्याने इन्स्टाग्रामवर एका व्यक्तीचा फोटो अपलोड केला आणि फॉलोवर्सला विचारले की तुम्ही याला ओळता का. सुरूवातीला वॉर्नरला हा पपाराजी वाटला पण नंतर वॉर्नरच्या मुलींच्या डान्स क्लासबाहेर या व्यक्तीला पाहिले तर वॉर्नर चिंतीत झाला. 


 



वॉर्नरने इन्स्टाग्रामवर म्हटले की , कोणी याला ओळखतं का. तो पपाराजीही असू शकतो किंवा नाही. त्याने सुरूवातीला सुपरमार्केटमध्ये जाताना माझा आणि कँडीचा पाठलाग केला. नंतर माझ्या मुलींच्या डान्स क्लास बाहेर तो अगोदरपासून उपस्थित होता. मी थोडा चिंतेत आहे. हा आमचा पाठलाग तर नाही करत आहे. आम्ही पपाराजीचा सन्मान करतो, तेही आमचा सन्मान करता. पण हा व्यक्ती असा आहे की त्याने असेच काहीच केले नाही, त्याला शोधा... 


वॉर्नरने गेल्या महिन्यात १०० वा वन डे सामना खेळला. त्यात त्याने शतक झळकावून त्याला कायम लक्षात ठेवणारा सामना केला.