`मला कसलाच पश्चाताप नाही...`, बॉल टॅम्परिंग प्रकरणावर David Warner स्पष्टच बोलला, म्हणतो `आयपीएलमध्ये माझ्यावर...`
David Warner on ball-tampering scandal : संपूर्ण काळात माझ्या संपूर्ण कारकिर्दीचा विचार केला अन् मला कोणताही पश्चाताप होत नाही. कारण जेव्हा तुम्ही पुढे जाल तेव्हा तुम्हाला अनेक अडथळ्यांचा सामना (captaincy ban) करावा लागेल, असं डेव्हिड वॉर्नर म्हणाला आहे.
David Warner On ball tampering : ऑस्ट्रेलियाचा तडाखेबाज फलंदाज डेव्हिड वॉर्नर (David Warner Retirement) याने वनडे क्रिकेटला अलविदा केलाय. टेस्ट क्रिकेटला रामराम ठोकल्यानंतर वॉर्नरने वनडे फॉरमॅटची रजा घेतलीये. त्यामुळे आता अनेक चाहत्यांचा हिरमोड झाल्याचं पहायला मिळतंय. आपल्या घातक फलंदाजीच्या जोरावर भल्या भल्या गोलंदाजांना फोडून काढणारा वॉर्नर सँडपेपर गेट प्रकरणात (Sandpaper Gate scandal) अडकला होता. त्यामुळे त्याच्यावर एका वर्षाची बंदी देखील घालण्यात आली होती. त्यावर बोलताना वॉर्नरने कोणताही पश्चाताप होत नसल्याचं वक्तव्य केलंय.
काय म्हणाला David Warner ?
मी जेव्हा मागे वळून पाहतो, तेव्हा मला वाटतं की बॉल टेम्परिंग (Ball tampering) प्रकरण वेगळ्या पद्धतीने हाताळलं गेलं पाहिजे होतं. पण निक हॉकले यांनी ज्याप्रकारे प्रकरण हाताळलं आणि बोर्डासमोर आमचं म्हणणं मांडलं आणि निर्णय झाला. त्यामुळे मी खुश आहे. आता त्या गोष्टीतून मी खुप पुढे आलोय, असं डेव्हिड वॉर्नरने म्हटलं आहे. त्या संपूर्ण काळात माझ्या संपूर्ण कारकिर्दीचा विचार केला अन् मला कोणताही पश्चाताप होत नाही. कारण जेव्हा तुम्ही पुढे जाल तेव्हा तुम्हाला अनेक अडथळ्यांचा सामना करावा लागेल. वाटेत अडथळे येतील पण तुम्हाला पुढं जायचं आहे आणि मी ते सन्मानानं केलंय, असं वॉर्नर म्हणतो.
आजीवन नेतृत्व बंदी आणि क्रिकेट ऑस्ट्रेलियाचा आढावा घेण्याच्या पद्धतींबद्दल अजूनही कटुता आहे का? असा सवाल वॉर्नरला विचारला गेला. आयपीएलमध्ये सनरायझर्स हैदराबाद आणि दिल्ली कॅपिटल्सचे नेतृत्व करणाऱ्या वॉर्नरने सांगितलं की, मला टी-20 लीगमध्ये नेतृत्व करताना आनंद झाला. मी माझ्या नेतृत्वाच्या भूमिकेचा आनंद लुटला आहे. नेतृत्व म्हणजे कर्णधार किंवा उपकर्णधार होणं नाही. माझ्यासाठी मी या संघाचे नेतृत्व करतो, असंही वॉर्नर म्हणाला आहे.
वर्ल्ड कपमध्ये आम्ही ज्या स्थानावर होतो तिथून जिंकणे खूप छान होते. संघात सर्व काही अगदी शांत होते. आम्ही आमच्या क्षमतेनुसार प्रशिक्षण देऊन स्वतःला तयार करायचो आणि नंतर मैदानावर कामगिरी करायचो. आम्ही सलग दोन सामने हरलो तेव्हा आमचे एकमेकांशी असलेले संबंध अधिक घट्ट झाले अन् सर्वांनी प्रयत्न केले. त्याचं फळ आम्हाला मिळालं, असं डेव्हिड वॉर्नरने म्हटलं आहे.
दरम्यान, बुधवारपासून एससीजी येथे सुरू होणाऱ्या पाकिस्तानविरुद्धच्या तिसऱ्या आणि शेवटच्या कसोटी सामन्यानंतर सर्वात लांब फॉरमॅटमधून निवृत्त होणार आहे. तर त्याआधीच वॉर्नरने निवृत्ती जाहीर केलीये. त्यामुळे आता वॉर्नर वनडे संघात दिसणार नाही. ऑस्ट्रेलियाचा सर्वात तगडा सलामीवीर फलंदाज आता आपल्याला शतक झाल्यावर गगनाला भिडताना दिसणार नाही.