सिडनी : रविवारी सिडनी क्रिकेट मैदानावर भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील दुसर्‍या एकदिवसीय सामन्यात यजमान कांगारू संघाचा सलामीवीर डेव्हिड वॉर्नर जखमी झाला. भारताच्या डावादरम्यान क्षेत्ररक्षण करताना वॉर्नरला दुखापत झाली होती, त्यामुळे त्याला अखेरच्या वनडे तसेच तीन सामन्यांच्या टी-20 मालिकेमधून वगळण्यात आले आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अशा परिस्थितीत डेव्हिड वॉर्नरच्या अनुपस्थितीत आपल्या संघासाठी ओपनिंग करण्यासाठी सज्ज असल्याचे मत उजव्या हाताचा फलंदाज मार्नस लाबुशाने याने व्यक्त केले आहे. वॉर्नरला दुसर्‍या वनडे सामन्यात दुखापत झाली होती, त्यामुळे तो संघातून बाहेर झाला आहे. पहिल्या दोन सामन्यात डेव्हिड वॉर्नरने आपल्या संघाला चांगली सुरुवात दिली, ज्यामुळे संघाने दोन्ही सामने जिंकले. त्या जोरावर कांगारू संघाने तीन सामन्यांच्या मालिकेत 2-0 असा विजय मिळवला.



ऑस्ट्रेलियाने भारताविरुद्ध पहिल्या एकदिवसीय सामन्यात 374 धावांचा विशाल डोंगर उभारला. कांगारू संघाने दुसर्‍या वनडेमध्ये 389 धावा केल्या. स्टीव्ह स्मिथने दोन्ही सामन्यात शतक झळकावले तर डेव्हिड वॉर्नरने दोन्ही सामन्यात अर्धशतक ठोकले. पहिल्या सामन्यात अॅरोन फिंचने शतक आणि दुसर्‍या सामन्यात अर्धशतक झळकावले. दुसर्‍या सामन्यात मार्नस लाबुशाने 61 बॉलमध्ये 70 धावा केल्या होत्या.