मुंबई : भारतात कसोटी सीरिजमध्ये टीम इंडियाला पराभूत करण्याचं स्वप्न प्रतिस्पर्धी टीमचं असतं. मात्र आता तर चक्क एका विदेशी खेळाडूनं पण केला आहे. भारताच्या मैदानात कसोटी सीरिज जिंकून आपण निवृत्ती घेणार असं एका धडाकेबाज फलंदाजानं जाहीर केलं आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

ऑस्ट्रेलिया संघातील स्फोटक सलामीवीर फलंदाज डेव्हिड वॉर्नरने भारतातील कसोटी सीरिजबाबत मोठे वक्तव्य केलं. भारतात कसोटी सीरिज जिंकल्यानंतर निवृत्ती घेईन असं डेव्हिड वॉर्नर म्हणाला आहे. 


17 वर्षांपासून ऑस्ट्रेलिया भारतात कसोटी सीरिज जिंकण्यासाठी धडपड करत आहे. 2004 मध्ये ऑस्ट्रेलियाने भारतीय भूमीवर कसोटी मालिकेत टीम इंडियाला 2-1 ने पराभूत केले होते. यानंतर भारताने प्रत्येक वेळी ऑस्ट्रेलियाला घरच्या मैदानावर पराभूत केलं आहे. 


भारतात कसोटी जिंकण्याचं मोठं स्वप्न 
2022 मध्ये भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया सामना होणार आहे. वॉर्नरच्या म्हणण्यानुसार त्याला टीम इंडियाला भारतात पराभूत करून आपल्या संघाला जिंकवून द्यायचं आहे. त्याशिवाय इंग्लंड संघाला देखील एशेज सीरिजमध्ये पराभूत करण्याचं त्याचं स्वप्न आहे. हे स्वप्न पूर्ण होताच क्षणी तो क्रिकेटमधून निवृत्ती घेण्याबाबत विचार करेल असं सांगितलं आहे. 


डेव्हिड वॉर्न हा ऑस्ट्रेलिया संघाचा सलामीवीर फलंदाज आहे. वन डे किंवा टी 20 असो किंवा कसोटी तिन्ही फॉरमॅटमध्ये वॉर्नरच्या बॅटिंगचा जलवा पाहायला मिळाला आहे. 


एशेज सीरिज दरम्यान डेव्हिड वॉर्नरला संन्यास घेण्यासंदर्भात त्याचा काय प्लॅन असणार यावर जेव्हा प्रश्न विचारला त्यावर उत्तर देताना त्याने आपलं हे स्वप्न पूर्ण केल्यानंतर पुढे क्रिकेटमधून निवृत्ती घेण्याचा विचार करेन असं तो म्हणाला आहे.