डेव्हिड वॉर्नरकडून रोहित शर्मावर `चोरी`चा आरोप! सोशल मीडियावर दोन्ही खेळाडू आमने-सामने
आता तुम्हाला देखील हे वाचल्यावरती एवढं काय मोठ झालं असावं असा प्रश्च पडला असेल.
मुंबई : रोहित शर्मा हा भारताचा एक उत्कृष्ट खेळाडू आहे. त्याची एकदा का बॅट चालली की, ती मागे पुढे पाहातच नाही. सगळ्यांनी रोहित शर्माचा आयपीएलमधील खेळ पाहिला आहे, तेथे त्याची बॅट फारशी काही चालली नाही, ज्यामुळे चाहत्यांना आता रोहितला टी -20 वर्ल कपसाठी मैदानात खेळताना पाहायचे आहे. रोहित देखील त्याच्या तयारीला लागला आहे. रोहितच काय तर सगळेच खेळाडू आता आपआपल्या पद्धतीने मॅच खेळण्यासाठी सज्ज होत आहेत.
परंतु त्यापूर्वी ऑस्ट्रेलियन खेळाडू डेव्हिड वॉर्नरकडून एक खळबळजनक दावा करण्यात आला आहे, ज्याची सोशल मीडियावरती चर्चा होत आहे. डेव्हिड वॉर्नरने सोशल मीडियावर सर्वांच्या समोर रोहित शर्मावरती चोरीचा आरोप लावला आहे.
आता तुम्हाला देखील हे वाचल्यावरती एवढं काय मोठ झालं असावं असा प्रश्च पडला असेल, परंतु हे प्रकरण तुम्हाला वाटतंय तेवढं गंभीर नाही. परंतु हे खरं आहे की, ऑस्ट्रेलियन खेळाडू डेव्हिड वॉर्नरने रोहितवर चोरीचा आरोप लावला आहे.
खरेतर रोहित शर्माने एक सोशल मीडिया पोस्ट शेअर केलाी, त्यावर प्रतिक्रिया देताना डेव्हिड वॉर्नरने लिहिले की, 'तु माझ्या टिक टॉकची कॉपी करत आहेस'. सोशल मीडियावर पोस्ट केलेल्या व्हिडीओमध्ये रोहित शर्मा त्याच्या हॉटेलच्या खोलीत दिसत आहे. आधी त्याने टीम इंडिया ज्या जर्सीत वर्ल्ड कप खेळणार आहे, त्या जर्सीतील टी-शर्ट दाखवला आणि नंतर त्याची पॅन्ट दाखवली. त्यानंतर त्याने त्या दोन्ही वस्तू बेडवरती ठेवल्या आणि त्यावर उडी मारली आणि क्षणात रोहित त्या जर्सीमध्ये दिसला.
त्यानंतर रोहित शर्माच्या या पोस्टवर, डेव्हिड वॉर्नरने त्याच्यावर त्याच्या टिक-टॉक स्टाईलची कॉपी केल्याची कमेंट केली, तर युजवेंद्र चहलने त्याच्या बेडवर कमेंट केली आहे.
रोहित पहिल्या सराव सामन्यात खेळला नाही
टीम इंडिया 18 ऑक्टोबर रोजी इंग्लंडविरुद्ध पहिला वार्म अप खेळला. या सामन्यात रोहित शर्मा खेळाला नाही. आता तो दुसऱ्या सराव सामन्यात खेळताना दिसेल अशी अपेक्षा आहे. भारताला आपला पहिला मुख्य सामना 24 ऑक्टोबर रोजी पाकिस्तानविरुद्ध खेळायचा आहे.
भारताने इंग्लंडविरुद्ध पहिला पहिला सामना 7 गडी राखून जिंकला. भारताला हा विजय त्याच्या फलंदाजीच्या बळावर मिळाला. दुसरीकडे, ऑस्ट्रेलियानेही सरावमध्ये विजयाची चव चाखली आहे. त्याने न्यूझीलंडला 3 विकेटने पायदळी तुडवले आहे. न्यूझीलंडने प्रथम खेळताना 158 धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात ऑस्ट्रेलियाने हे लक्ष्य 19.5 ओव्हरमध्ये ते पूर्ण केले.