IPL सुरू असताना वॉर्नरला सोडून पत्नी आणि मुली गेल्या घरी
डेव्हिड वॉर्नरला सोडून पत्नी-मुली अचानक घरी का परतल्या? नेमकं असं काय घडलं?
मुंबई : आयपीएलचे सामने सध्या अधिक चुरशीचे होत आहेत. प्लेऑफसाठी स्पर्धा वाढली आहे. याच दरम्यान एक वाईट बातमी आहे. दिल्लीचा स्टार खेळाडू डेव्हिड वॉर्नरला सोडून पत्नी आणि मुली घरी परतल्या आहे. आयपीएल सुरू असताना अचानक हा निर्णय का घेतला याची चर्चा सगळीकडे होत आहे.
आयपीएलमध्ये खेळाडू आणि त्यांची पत्नी-मुलं कडक बायोबबलमध्ये राहात आहेत. आयपीएलच्या स्पर्धा संपण्यासाठी अजून महिन्याभराचा अवकाश आहे. असं असतानाही मुली आणि पत्नी अचानक मध्येच घरी का परतल्या नेमकं काय घडलं याची चर्चा होत आहे.
डेव्हिड वॉर्नरने इन्स्टाग्रामवर फोटो शेअर करून याबाबत महत्त्वाची माहिती दिली. दिल्ली टीममध्ये कोरोनाचं सावट आहे. आधीच एक खेळाडू आणि 5 सपोर्ट स्टाफ कोरोना पॉझिटिव्ह आले होते. कठोर बायो-बबलमुळे मुलींना दिवसभर खोली कोंडून राहावं लागत आहे.
कोरोनाचा धोका लक्षात घेता डेव्हिडने आपल्या पत्नी आणि मुलींना घरी परतण्याचा सल्ला दिला आहे. कोरोनाचं संकट लक्षात घेता पत्नी आणि मुली आपल्या घरी परतल्या आहेत.
माझ्या सुंदर मुलींना निरोप देण्याची ती वेळ आलीय असं म्हणत डेव्हिड वॉर्नरनं कॅप्शन दिलं आहे. वॉर्नर भावुकही झाला होता. कोरोनाचा धोका लक्षात घेऊन आणि मुलींच्या काळजीपोटी डेव्हिड वॉर्नरनं हा निर्णय घेतल्याची माहिती मिळाली आहे.
वॉर्नरच्या मुली स्टेडियममध्ये मॅचचा आनंद घेताना दिसल्या होत्या. तर बाबाला आऊट होताना पाऊन स्टेडियममध्ये मुली रडल्याचे व्हिडीओ देखील सोशल मीडियावर व्हायरल झाले होते.