मुंबई : केपटाऊन टेस्टमध्ये बॉलशी छेडछाड केलेल्या प्रकरणात दोषी ठरलेल्या ऑस्ट्रेलिया क्रिकेट टीममध्ये कॅप्टन स्टीव स्मिथ आणि उप कॅप्टन डेविड वॉर्नरवर क्रिकेट ऑस्ट्रेलियाने एक वर्ष बंदी घातली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

तसेच या वादात सहभागी असलेला फलंदाज कॅमरून बेनक्रॉफ्टवर 9 महिन्यांसाठी बंदी घातली आहे. या तीन खेळाडूंवर बंदी घातली असून त्यांना आंतरराष्ट्रीय आणि स्थानिक क्रिकेट सामन्यांपासून दूर ठेवलं आहे. विस्फोटक फलंदाजीसाठी लोकप्रिय असलेल्या वॉर्नरचे फॅन्स मात्र निराश झाले आहेत. आतापर्यंत त्याने अनेक विस्फोटक डाव खेळले आहेत. अशातच त्याचे फॅन्स फलंदाजीसाठी त्याला मिस करतील. 


पाहूयात डेविड वॉर्नरची 10 विस्फोटक डाव 


वॉर्नरने आतापर्यंत 106 वन डे सामने खेळले आहेत ज्यामध्ये 104 डावांमध्ये त्याने 4343 धावा केल्या आहेत. त्याचा सर्वाधिक स्कोर आहे 179 धावा. जो त्याने जानेवारी 2017मध्ये पाकिस्तान विरूद्ध खेळला होता. वन डे मध्ये त्याने 14 शतक केले आहेत. 


1) अफगाणिस्तानविरूद्ध केले 178 धावा 


4 मार्च 2015 रोजी अफगाणिस्तानच्या विरूद्ध वर्ल्ड कपच्या दरम्यानचा डेविड वॉर्नरचा खेळ कुणीच विसरू शकत नाही. ज्यामध्ये त्याने फक्त 133 चेंडूत 178 धावा केल्या आहेत. या दरम्यान त्याने 19 चौके आणि 5 षटकार लगावले. ऑस्ट्रेलियाने अफगाणिस्तानच्यासमोर 417 धावांच लक्ष्य ठेवलं होतं. मात्र अफगाणिस्तानची संपूर्ण टीम फक्त 142 धावांवरच तंबूत गेली. ऑस्ट्रेलियाने हा सामना 275 धावांनी जिंकला. 


2) दक्षिण आफ्रिकेच्या विरूद्ध 173 धावा केल्या 


12 नोव्हेंबर 2016 मध्ये दक्षिण आफ्रिकेच्या विरूद्ध डेविडने उत्कृष्ठ कामगिरी केली. केपटाऊनमध्ये डेविडने 136 बॉलमध्ये 173 धावा केल्या. वॉर्नरने या खेळा दरम्यान 24 चौके मारले. मात्र एवढा उत्तम खेळूनही त्याने आपल्या संघाला विजय मिळवून दिला नाही. दक्षिण आफ्रिकेने 328 धावांच लक्ष्य ठेवलं होतं. मात्र ऑस्ट्रेलियाने 296 धावा केल्या. 


3) न्यूझीलंड विरूद्ध 156 धावांचा सामना 


9 डिसेंबर 2016 मध्ये वॉर्नरने न्यूझीलंडच्या विरूद्ध मेलबोर्न क्रिकेट ग्राऊंडवर आपल्या बॅटिंगचा उत्तम खेळ सादर केला. वॉर्नरने 128 चेंडूत 156 असा तूफानी डाव मांडला. आपल्या या डावात त्याने 13 चौके आणि 4 गगनचुंबी षटकार लगावले. ऑस्ट्रेलियाच्या 264 धावांच्या उत्तरासमोर न्यूझीलंड फक्त 147 धावा करू शकली. 


4) पाकिस्तानविरूद्ध 179 धावांचा डाव 


गेल्या वर्षी 26 जानेवारीला वॉर्नरने पाकिस्तानच्या विरूद्ध 179 धावांचा विस्फोटक खेळ दाखवला. त्याने वनडेमध्ये सर्वोत्तम स्कोर केला आङे. वॉर्नरने 128 धावांत 179 रन्स केले आहे. ऑस्ट्रेलियाने पाकिस्तानच्या समोर 369 धावा करून स्कोर उभा केला आहे. 


5) टेस्टमध्ये 274 धावांचा खेळ सादर केला 


13 नोव्हेंबर 2015 मध्ये न्यूझीलंडच्या विरूद्धा वाका ग्राऊंडमध्ये खेळ 253 धावांचा केला. हा खेळ सर्वांच्याच लक्षात राहिलेला आहे. 253 धावांच्या टेस्टमध्ये वॉर्नरने उत्तम स्कोर सादर केला आहे.