मुंबई : यंदाच्या आयपीएलमध्ये कोरोना घुसला. मार्शचा रिपोर्ट कोरोना पॉझिटिव्ह आला. त्याच्यासोबत 5 सपोर्ट स्टाफचे कर्मचारी कोरोना पॉझिटिव्ह आले. सामना स्थगित करावा लागतो की काय अशी भीती होती. मात्र दिल्ली टीमचं मनोबल खचलं नाही. दिल्ली टीमने या तणावाच्या परिस्थितीतही धीर दाखवला. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पंजाब विरुद्ध झालेल्या सामन्यात दिल्लीने एकहाती सामना जिंकला. 9 विकेट्सनं पंजाबचा पराभव केला. कोरोनामुळे पुण्यात होणारी मॅच रद्द करावी लागली आणि पुण्यातील ब्रेबॉर्नवर सामना रंगला. 


पंजाबच्या टीमला 115 धावांवर तंबुत धाडण्यात दिल्लीला यश आलं. सामना जिंकल्यानंतर खेळाडूंच्या चेहऱ्यावरचा आनंद वेगळाच होता. दिल्लीचा हा तिसरा विजय आहे. या सामन्यानंतर पंत आणि वॉर्नरने झुकेगा नही ही पुष्पाची स्टेप केली. 


ड्रेसिंग रूममध्ये देखील हाउज द जोश असं वॉर्नरने विचारल्यावर तेवढ्याच जोशात त्याला टीममधील खेळाडूंनी उत्तम प्रतिसाद दिला आहे. दिल्ली टीमचा हा उत्साह पाहून आपल्यालाही एक वेगळाच जोश येतो.