मुंबई : दोन शत्रू अखेर आयपीएलमुळे मित्र झाले आहेत. त्यांनी एकमेकांची गळाभेट घेऊन अखेर दोघंही एकमेकांशी नीट वागत आहेत. क्रिकेटच्या मैदानात किंवा बाहेर खेळाडूंचे वाद होतात. ते वाद मैदानातही दिसतात पण आयपीएलमुळे कट्टर शत्रू मित्र झाले आहेत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कृणाल पांड्या आणि दीपक हुड्डा यांचा एकमेकांमधील वाद संपूर्ण जगाला माहीत आहे. करिअर संपवण्याची धमकी दिल्याचं दीपक हुड्डाने कृणाल पांड्यावर गंभीर आरोप केला. या दोघांमध्ये धुसफूस होती. आयपीएलच्या पंधराव्या हंगामात दोघंही लखनऊ टीमकडून खेळत आहेत. 


लखनऊ टीममधून खेळताना दीपक हुड्डाने कृणालला मैदानात मिठी मारल्याचा फोटो व्हायरल झाला होता. तीन सामन्यानंतर आता दीपक हुड्डाचा सूर बदलला आहे. त्याने कृणाल पांड्याबद्दल मनात असलेला राग काढून टाकला. 


दीपक हुड्डा आणि कृणाल पांड्या पक्के दोस्त बनले आहेत. शत्रूचे मित्र झाले आहेत आणि ते शक्य झालं या आयपीएलमध्ये. लखनऊकडून खेळणाऱ्या दीपक हुड्डाने आता कृणाल पांड्यावर मोठं वक्तव्य दिलं आहे. 


कृणाल माझ्या भावासारखा आहे. भाऊ तेवढ्याच हक्काने भांडतोही आमचं लक्ष्य एकच आहे सोबत खेळून टीमला विजय मिळवून देणं. कृणालला दीपक हुड्डाने भावाचा दर्जा दिला आहे. याआधी दीपक हुड्डाने कृणाल पांड्यावर गंभीर आरोप केले होते. 


जी गोष्ट घडली ती घडून गेली आहे. आता आम्ही एका टीममधून खेळतोय त्यामुळे आमचं लक्ष्य एक आहे असंही पुढे दीपक हुड्डा म्हणाला. दीपक आणि कृणाल एकत्र आयपीएलमध्ये लखनऊ टीमकडून खेळत आहे.