मुंबई : दिल्ली विरुद्ध लखनऊ झालेल्या रोमांचंक सामन्यात पंतच्या टीमचा 6 धावांनी पराभव झाला. लखनऊ टीमने विजय साजरा केला. या विजयावेळी गौतम गंभीर यांचं वेगळं रुप पाहायला मिळालं. मॅच जिंकल्यानंतर त्यांचा शिवीगाळ करतानाचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

हातातोंडाशी आलेला घास दिल्लीने हिरावून घेऊ नये यासाठी लखनऊने अटोकाट प्रयत्न केले. त्याचं चांगलं फळ लखनऊ टीमला मिळालं. अवघ्या 6 धावांसाठी दिल्ली टीमला पराभव स्वीकारावा लागला. 


मॅचनंतर गौतम गंभीर यांनी अशी प्रतिक्रिया दिली की नक्की काय घडलं हे कोणालाच कळलं नाही. सगळेजण हैराण झाले. त्यांनी मॅच जिंकल्यानंतर शिवीगाळ केली.


लखनऊ टीमच्या विजयानंतर गौतम गंभीर यांचा संयम सुटला. त्यांनी आनंद साजरा करताना शिवीगाळ केल्याचं कॅमेऱ्यात कैद झालं. त्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. रोमांचक सामना पाहून गंभीर यांना स्वतःवर नियंत्रण ठेवता आले नाही त्यामुळे हा प्रकार घडला. 


रोमांचक सामन्यात दिल्ली टीमला विजयासाठी 21 धावांची गरज होती. तेव्हा मार्क स्टोइनिसने शेवटच्या ओव्हरला बॉलिंग केली. दोन बॉलवर 13 धावांची गरज होती. दिल्लीला विजयासाठी 6 धावा कमी पडल्या. त्यामुळे लखनऊचा विजय झाला. पॉईंट टेबलमध्ये लखनऊ टीम दुसऱ्या स्थानावर पोहोचली आहे.