मुंबई :  आयपीएलच्या 15 व्या मोसमातील (IPL 2022) 34 वा सामना दिल्ली कॅपिट्ल्स (Delhi Capitals) विरुद्ध राजस्थान रॉयल्स (Rajsthan Royals) यांच्यात खेळवण्यात आला. या सामन्यातील शेवटच्या ओव्हरमध्ये अंपायरने नो बॉल (No Ball) दिला नाही. यावरुन जंगी राडा झाला. दिल्लीचा कॅप्टन ऋषभ पंतने (Rishabh Pant) अंपयारने नो बॉल देण्याच्या निर्णयावरुन नाराजी व्यक्त केली. पंतने डग आऊटमधून केलेला राडा सर्वांनी पाहिला. यानंतर पंतला सोशल मीडियावर ट्रोल केलं जातंय. (dc vs rr ipl 2022 netizens trolled to delhi capitals captain rishabh pant after his asking to rovman powell stop play)


नक्की काय झालं होतं?


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

राजस्थानने दिल्लीला विजयासाठी 223 धावांचे आव्हान दिलं होतं. दिल्लीने जोरदार बॅटिंग करत राजस्थानला चोख प्रत्युत्तर दिलं. सामना रंगतदार स्थितीत पोहचला होता. दिल्लीला शेवटच्या 20 व्या ओव्हरमध्ये 36 धावांची गरज होती.


मैदानात रॉवमेन पॉवेल आणि कुलदीप यादव हे दोघे होते. पॉवेलने पहिल्या 3 बॉलमध्ये 3 कडक सिक्स खेचले. त्यामुळे दिल्लीच्या विजयाच्या आशा आणखी वाढल्या होत्या. दिल्लीच्या गोटात उत्साहाचं तर राजस्थानच्या टीममध्ये भितीचं वातावरण होतं. 


दिल्लीला आता 3 बॉलमध्ये 18 धावांची गरज होती. मात्र ओबेड मॅकॉयने चौथा बॉल फुलटॉस टाकला. त्यामुळे हा नो बॉल आहे, असं ठाम मत दिल्लीचं होतं. मात्र अंपायरने नो बॉल दिला नाही. यावरुन वादाला तोंड फुटलं. 


डग आऊटमधून पंतने नाराजी व्यक्त केली. आपल्या दोन्ही फलंदाजांना इशारा करत मैदानाबाहेर बोलावलं. या सर्व राड्यामुळे जवळपास 3 मिनिटं खेळ थांबला होता. 


अंपायरने नो बॉल न दिल्याने दिल्लीची असिस्टंट कोच प्रविण आमरे मैदानात आले. त्यांनीही अंपायरसोबत वाद घालत नो बॉल न दिल्याने नाराजी व्यक्त केली. मात्र इतकं होऊनही अंपायर आपल्या निर्णयावर ठाम होते.


रिषभ पंत, प्रवीण आमरे आणि शार्दुल ठाकूर यांनी अंपायरच्या या निर्णयाचा उघड उघड विरोध केला. त्यामुळे या तिघांविरुद्ध नियमांचं उल्लंघ केल्याप्रकरणी दंडात्मक कारवाई करण्यात आली. 


दरम्यान पंतने केलेल्या कृतीवरुन त्याला सोशल मीडियावर ट्रोल केलं जातंय. तसेच अनेक मिम्स व्हायरल होतायत. "खेळाडूंना परत बोलावयला हा काय गल्ली क्रिकेट खेळतोय का?", "तसेच असं काही करायची गरज होती का?", असे शाब्दिक चिमटेही रिषभला नेटकऱ्यांनी काढले आहेत.