DC vs SRH IPL 2024: आज दिल्ली विरुद्ध हैदराबाद आमनेसामने, कोण जिंकणार सामना? पाहा पिच रिपोर्ट अन् हेड टू हेड रेकॉर्ड
DC vs SRH IPL 2024: आज दिल्ली विरुद्ध हैदराबाद सामना रंगणार आहे. दिल्लीसमोर हैदराबादच्या फलंदाजांना रोखण्याचे आव्हान असणार आहे.
Delhi Capitals vs Sunrisers Hyderabad: आयपीएलच्या 17 व्या हंगामातील 35 वा सामना हा दिल्ली कॅपिट्ल्स विरुद्ध सनरायजर्स हैदराबाद रंगणार आहे. ऋषभ पंत दिल्ली कॅपिट्ल्सचं नेतृत्व करणार आहे. तर पॅट कमिन्स याच्याकडे सनरायजर्स हैदराबादच धुरा असणार आहे. दिल्लीचा हा आठवा आणि हैदराबादचा सातवा सामना असणार आहे. आजचा (20 एप्रिल 2024) चा सामना दिल्ली येथील अरुण जेटली स्टेडियम येथे होणार आहे.
आयपीएलमध्ये सनरायझर्स हैदराबादचे फलंदाज पूर्ण फॉर्ममध्ये आहेत. आरसीबीविरुद्ध खेळल्या गेलेल्या सामन्यात ट्रॅव्हिस हेडने बॅटने चांगलाच गोंधळ घातला. हेडने 41 चेंडूत 102 धावांची तुफानी खेळी खेळली. त्याचवेळी हेनरिक क्लासेनने 31 चेंडूत 67 धावा केल्या होत्या. शेवटच्या षटकांमध्ये ॲडम मार्कराम आणि अब्दुल समद यांनीही आपल्या तुफानी फलंदाजीने चाहत्यांचे मनोरंजन केले.
हेड टू हेड आकडेवारी
हैदराबाद संघाने त्यांच्या 6 पैकी 4 सामने जिंकले असून ते सध्या गुणतालिकेत चौथ्या स्थानावर आहेत. तर दिल्ली संघाने सलग 2 विजय मिळवले असून गुणतालिकेत सहाव्या स्थानावर आहे.तर दोन्ही संघ आतापर्यंत 23 वेळा आमनेसामने आले आहेत. त्यापैकी हैदराबादने 12 आणि दिल्लीने 11 सामने जिंकले आहेत.
अशी असेल खेळपट्टी
अरुण जेटली स्टेडियमची खेळपट्टी आधी कमी स्कोअरिंग ट्र्रॅक म्हणून ओळखला जात होती. 2023 च्या एकदिवसीय विश्वचषकासाठी येथील खेळाच्या मैदानात महत्त्वपूर्ण बदल झाले आहेत. येथील मैदाने फलंदाजांसाठी चांगली आहेत. त्यामुळे मैदानावर उच्च स्कोअर होतो. येथे नाणेफेक जिंकणारा संघ प्रथम फलंदाजी करु करताना पाहायला मिळते.
हवामानाचा अंदाज
दिल्ली आणि हैदराबाद (DC vs SRH) यांच्यातील सामन्यात अरुण जेटली क्रिकेट स्टेडियममध्ये पावसाची शक्यता नाकारता येत नाही. दिल्लीत संध्याकाळी तापमान 29 अंशांच्या आसपास राहण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर खेळाडू आणि प्रेक्षकांनाही जास्त उन्हाचा सामना करावा लागणार नाही.
दोन्ही संघांची प्लेइंग इलेव्हन
दिल्ली कॅपिटल्स संभाव्य प्लेइंग 11 : पृथ्वी शॉ, डेव्हिड वॉर्नर/सुमित कुमार, जेक फ्रेझर-मॅकगर्क, ट्रिस्टन स्टब्स, शाई होप, ऋषभ पंत (कर्णधार आणि यष्टिरक्षक), अक्षर पटेल, कुलदीप यादव, इशांत शर्मा, मुकेश कुमार, खलील अहमद.
सनरायझर्स हैदराबादचे संभाव्य प्लेइंग 11: ट्रॅव्हिस हेड, अभिषेक शर्मा, एडन मार्कराम, हेनरिक क्लासेन (यष्टीरक्षक), अब्दुल समद, नितीश रेड्डी, शाहबाज अहमद, पॅट कमिन्स (कर्णधार), भुवनेश्वर कुमार, जयदेव उनाडकट, टी नटराजन