नवी दिल्ली : दक्षिण आफ्रिका आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात केपटाऊनमध्ये सुरु असलेल्या तिसऱ्या टेस्ट मॅछमध्ये आफ्रिकेच्या डीन एल्गरने जबरदस्त खेळी खेळली. डीन एल्गरने नॉट आऊट १४१ रन्सची इनिंग खेळी खेळत नवा रेकॉर्ड आपल्या नावावर केला आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

डीन एल्गनरने खेळलेल्या इनिंगमुळे दक्षिण आफ्रिकेच्या टीमला ३११ रन्सपर्यंत मजल मारता आली. यासोबतच डीन एल्गरने टेस्ट मॅचेसमध्ये ३००० रन्सही पूर्ण केले. हा कारनामा करणारा डीन एल्गर हा १३वां दक्षिण आफ्रिकन बॅट्समन ठरला आहे.


यासोबतच डीन एल्गर क्रिकेट विश्वातील अशा बॅट्समनच्या यादीत पोहोचला आहे ज्याने पहिल्या टेस्टमधील दोन्ही इनिंग्समध्ये शून्यावर आऊट झाला असतानाही नंतर चांगली कामगिरी केली आहे. डीन एल्गर पहिल्या टेस्टमध्ये शून्यावर आऊट झाल्यानंतर खचून न जाता चांगलं यश मिळवलं आणि सेंच्युरीही लगावली. या यादीत इंग्लंडचा बॅट्समन ग्राहम गूच याचाही समावेश आहे.



पहिल्या टेस्ट मॅचमधील दोन्ही इनिंग्समध्ये शून्यावर आऊट झाले असतानाही १० हून अधिक सेंच्युरी करणाऱ्या खेळाडूंच्या यादीवर एक नजर टाकूयात...


खेळाडू                     देश               सेंच्युरी 


ग्राहम गूट               इंग्लंड               २० 


मार्वन अट्टापटू        श्रीलंका               १६


सईद अनवर        पाकिस्तान            ११


डीन एल्गर       दक्षिण आफ्रिका         ११


यापूर्वीही डीन एल्गरने टेस्ट क्रिकेटच्या इतिहासात जगातील दुसरा असा बॅट्समन बनला आहे ज्याने ३ वेळा एका इनिंगमध्ये बेट केरी (पहिला बॉल खेळण्यानंतर शेवटपर्यंत नॉट आऊट राहणं) केलं आहे. यापूर्वी हा रेकॉर्ड वेस्ट इंडिजचा ओपनर बॅट्समन डेसमंड हेंस याच्या नावावर होता. डीन एल्गनर ५३ रन्सवर खेळत असताना नाथन लियॉन याने त्याची कॅच ड्रॉप केली होती.