मुंबई : आयपीएल ही जगातील सर्वात मोठी लीग आहे. इथे एकमेकांविरुद्ध खेळणारे खेळाडू एकाच टीममध्ये देखील खेळतात. पण यंदाच्या आयपीएलमध्ये दोन कट्टर शत्रू एकमेकांचे मित्र होत आहेत. दीपक हुड्डा आणि कृणाल पांड्या लखनऊ टीमकडूम खेळत आहेत. त्यांची दुश्मनी संपूर्ण जगानं पाहिली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

एकेकाळी कृणाल पांड्याने करिअर संपवण्याची धमकी दिल्याचा आरोप दीपक हुड्डाने केला होता. आता दीपक हुड्डाचे शब्द फिरले असून त्याने कृणाल पांड्या मला भावासारखा असल्याचं म्हटलं आहे. या सगळ्यानंतर आता कृणाल आणि दीपक हुड्डा एकत्र बॅटिंगसाठी मैदानात उतरले. 


या दोघांची दुश्मनी ते मैत्री असा प्रवास पाहता सोशल मीडियावर मीम्सचा पाऊस सुरू झाला. या दोघांना मैदानात एकत्र भागीदारी करताना पाहून मीम्स व्हायरल होत आहेत. 


एक युजर म्हणतो हे दोघंच RCB साठी पुरेसे आहेत. तर दुसरा म्हणतो माझ्या शत्रूच माझा मित्र, तर एका युजरने म्हटलं आहे दोन दिग्गज खेळाडू मैदानात आले आहेत काही बोलू नका. सोशल मीडियावर क्रिकेटप्रेमींनी त्यांची मजा घेतली आहे. 


दीपक हुड्डा आणि कृणाल पांड्या याआधी एकमेकांना मिठी मारताना दिसले होते. तर दीपक हुड्डाने आपले शब्द बदलले असून कृणाल पांड्या मला भावासारखा असल्याचं म्हटलं होतं. 


लखनऊ टीमने बंगळुरू विरुद्धचा सामना 18 धावांनी गमावला. फाफ ड्यु प्लेसीसला सामना जिंकण्यात यश आलं. फाफचं शतक 4 धावांसाठी हुकलं पण सामना जिंकण्यात यश आलं. तर लखनऊच्या के एल राहुलने विराट कोहलीचा रेकॉर्ड मोडला.