मुंबई : टीम इंडियाचा (Team India) माजी कर्णधार विराट कोहली (Virat Kohli) गेल्या अनेक काळापासून आऊट ऑफ फॉर्म आहे. विराट सातत्याने अपयशी ठरतोय. विराटला कसोटी, वनडे आणि टी 20 या तिन्ही फॉर्मेटमध्ये चमक दाखवता येत नाहीये. त्यामुळे विराटला आता टीममधून बाहेर करा, अशी मागणी जोर धरतेय. टी 20 मध्ये युवा खेळाडू चमकदार कामगिरी करतायेत. त्यामुळे विराटला टीममधून आऊट करण्याची जोरदार मागणी केली जात आहे. (deepak hooda suryakumar yadav and shreyas iyer probable candidate for 3rd number spot where virat kohli played)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सूर्यकुमार यादव, श्रेयस अय्यर आणि दीपक हुड्डा या युवा खेळाडूंनी धमाकेदार कामगिरी केली आहे. यासह या तिकडीने टीम इंडियामधील विराटच्या जागेसाठी (तिसरा क्रमांक) दावा केला आहे. विराट आधी तिसऱ्या स्थानी खेळायचा. मात्र विराट अपयशी ठरल्याने या जागेसाठी चढाओढ पाहायला मिळतेय.


दीपक, सूर्यकुमार आणि अय्यरची कामगिरी


अवघ्या काही महिन्यांवर टी 20 वर्ल्ड कप येऊन ठेपलाय. या वर्ल्ड कपच्या दृष्टीने कॅप्टन रोहित शर्मा संघाची मोट बांधण्याच्या प्रयत्नात आहे. त्यामुळेच टीम मॅनेजमेंट विविध खेळाडूंना संधी देत चांगला संघांची मोट बांधण्याचा प्रयत्न करतेय. त्यामुळेच दीपक, सूर्यकुमार आणि अय्यर ही तिकडी सातत्याने चमकदार कामगिरी करतायेत. या तिघांनी चांगली कामगिरी करत आपल्याकडे लक्ष वेधलंय.


दीपकने तिसऱ्या क्रमांकावर खेळताना आपली छाप सोडली आहे. दीपकने मागील 3 डावांमध्ये 183 धावा केल्या यआहेत. यामध्ये आयर्लंड विरुद्ध केलेल्या शतकी खेळीचा समावेश आहे. आयर्लंड विरुद्धच्या 2 सामन्यात खेळल्यानंतर दीपकला इंग्लंड विरुद्धच्या पहिल्या टी 20 सामन्यात संधी मिळाली. दीपकने या सामन्यात 33 रन्स केल्या. 


श्रेयसनेही सातत्याने शानदार कामगिरी करतोय. श्रेयसने 2022 या वर्षात आतापर्यंत खेळलेल्या 9 सामन्यांमध्ये 323 धावा केल्या आहेत. यात 3 अर्धशतकांचा समावेश आहे. तर सूर्यकुमार यादवने 6 टी 20 सामन्यात 161 धावा केल्या आहेत. या 65 धावांच्या अर्धशतकी खेळीचा समावेश आहे. 


तर कोहलीला 2022 या वर्षात 2 टी 20 सामने खेळण्याची संधी मिळाली आहे. विराटने या 2 सामन्यात 69 धावा केल्या आहेत. त्यामुळे आता विराटवर टीममधून बाहेर पडण्याचा धोका आहे.