नेमका टीम इंडियाचा गेम झाला, पराभवाने Adelaide च्या मैदानाचा इतिहास बदलला!
रोहित शर्माचं नशिबच फुटकं, त्याचाच भारतीय संघाला फटका?
ind vs eng : टीम इंडियाचा सेमी फायनलमध्ये इंग्लंड संघाकडून मानहानिकारक पराभव झाला (england beat team india semi fiinal t-20 world cup) आहे. या पराभवासह 130 कोटी भारतीयांच्या वर्ल्ड कपच्या स्वप्नांचा चुराडा झाला आहे. प्रबळ दावेदार असलेल्या भारतीय संघ फायनलमध्ये निश्चितचपणे एँन्ट्री करणार असं बोललं जात होतं, मात्र आता भारत स्पर्धेतून बाहेर झाला आहे. भारताने या पराभवास ह इतिहास बदलला आहे.
भारत आणि इंग्ल्डंडमध्ये Adelaide Oval मध्ये सामना खेळला गेला. या मैदानावरचा इतिहास पाहता भारताच्या पराभवाने तो बदलला आहे. Adelaide Oval मध्ये जवळपास 11 टी 20 सामने झाले आहेत त्यातील ज्या संघाने टॉस जिंकला आहे त्यांचा पराभव झाला आहे. आजच्या सामन्यात नेहमी टॉस जिंकणाऱ्या रोहित शर्माने टॉस हरला होता मात्र तरीही भारत सामना हरला आहे.
यंदाच्या टी20 वर्ल्ड कपचीच आकडेवारी पाहिली तर,ॲडलेड ओवलमध्ये आतापर्यंत 6 सामने झाले. यामध्ये जे संघ टॉस जिंकले त्यांना सामना गमवावा लागला होता. याआधी या मैदानावर भारताचा सामना बांगलादेशसोबत झाल होता. त्या सामन्यातही भारताने विजय मिळवला होता.
दरम्यान, आजच्या सामन्यातील भारताच्या पराभवासोबत ॲडलेड मैदानाचा इतिहास बदलला आहे. टॉस हरूनही सामन गमावणारा भारत पहिला संघ ठरला आहे. भारताचा वर्ल्ड कपमधील प्रवास संपला असून संघामधील खेळाडूही निराश झालेले आहेत.