मुंबई: देशात कोरोनाचे रुग्ण दिवसागणिक मोठ्या संख्येनं वाढत आहेत. कोरोनाचं संकट IPLवरही असल्याचं दिसत असताना धक्कादायक बातमी समोर आली आहे. सर्वसामान्य नागरिकांच्या रिपोर्टमध्ये घोळ झाल्याच्या अनेक बातम्या समोर येत असताना आता एका खेळाडूचा रिपोर्टही चुकीचा आल्याची माहिती मिळाली आहे. या खेळाडूच्या रिपोर्टमध्ये घोळ झाल्यानं त्याला मोठा फटका बसला आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

दिल्ली कॅपिटल्स संघातील गोलंदाज एर्निच नॉर्टिए याचा कोरोना रिपोर्ट चुकीचा आला. त्यामुळे त्याला दोन दिवस जास्त आयसोलेशनमध्ये राहावं लागलं. इतकंच नाही तर त्याला राजस्थान विरुद्ध झालेल्या नुकत्याच सामन्यात खेळता आलं नाही. 


तीन वेळा कोरोनाचा रिपोर्ट निगेटिव्ह आल्यानंतरच एर्निचला संघासोबत जाण्याची परवानगी मिळणार होती. मात्र त्यातील शेवटचा रिपोर्टमध्ये घोळ झाल्यानं त्याला पुन्हा क्वारंटाइन करण्यात आलं होतं.



एर्निचच्या कोरोना रिपोर्ट संदर्भात दिल्ली कॅपिटल्स संघानं ट्वीट करून माहिती दिली आहे. सध्या तो आयसोलेशनमधून बाहेर आला असून बायोबबलमध्ये जॉइन झाला आहे. सर्वजण तो मैदानात कधी उतरतो हे पाहण्यासाठी आतूर झाले आहेत. 


 अक्षर पटेल अद्याप फीट झाला नसल्यानं सध्या त्याच्यावर उपचार सुरू आहेत. अक्षर पटेलची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली होती. त्यामुळे सध्या तरी तो पुढचे काही सामने खेळू शकणार नाही. तर अक्षर पटेल ऐवजी शम्स मुलानीला संधी देण्यात आली आहे.