IPL 2025 मध्ये पहिल्यांदाच होणार दुहेरी कर्णधारचा प्रयोग, दिल्ली कॅपिटल्सच्या कर्णधारपदी केएल राहुल आणि ...
Delhi Capitals: आयपीएल 2025 साठी सर्व संघ सज्ज झाले आहेत. दिल्ली कॅपिटल्सनेही आपली टीम तयार केली आहे. आता संघाच्या कर्णधारपदाच्या चर्चा रंगल्या आहेत. याप्रकरणी मालक पार्थ जिंदाल यांनी मौन तोडले आहे.
Delhi capitals Captain: क्रिकेटप्रेमी आयपीएलची आतुरतेने वाट बघत असतात. आयपीएल चा यावर्षची सीजन (IPL 2025) लवकरच सुरु होणार आहे. यंदाच्या सिजनसाठी नुकताच सौदी अरेबिया येथे मेगा लिलाव झाला. या मेगा लिलावात खेळाडूसाठी चुरशीची लढाई बघता आली. आता संघांच्या कर्णधारपदाच्या चर्चांना उधाण आले आहे. दिल्ली कॅपिटल्सच्या (Delhi Capitals) संघाच्या कर्णधाराची तर जोरदार चर्चा होत आहे. दिल्ली कॅपिटल्सने आपला पूर्वीचा कर्णधार ऋषभ पंतला (rishabh pant) सोडले होते. आता संघाच्या कर्णधारपदासाठी 3 दावेदार आहेत, सध्या तरी कर्णधार कोण हे ठरलेले नाही मात्र दिल्लीचे मालक पार्थ जिंदाल यांनी संघाच्या कर्णधाराबाबत मोठा इशारा दिला आहे.
संघाच्या कर्णधारपदासाठी कोण आहेत ते 3 दावेदार
यंदा दिल्ली कॅपिटल्सने मेगा लिलावात आश्चर्यकारक खरेदी केली. दिल्लीने 14 कोटी रुपयांमध्ये केएल राहुलला आपल्या संघात समाविष्ट केले आहे. संघाने अष्टपैलू अक्षर पटेलला 16.50 कोटी रुपयांमध्ये रिटेन केले होते. दिल्ली कॅपिटल्सने एकेकाळी आरसीबी आणि एलएसजीचे कर्णधारपद भूषवलेल्या अनुभवी फाफ डू प्लेसिसला 2 कोटी रुपयांच्या मूळ किमतीत घेतले. हे तिघेही कर्णधारपदाचे दावेदार आहेत.
हे ही वाचा: 6,6,6,6,4... हार्दिकने CSK च्या बॉलरवर केला षटकारांचा वर्षाव, एका ओव्हरमध्ये केल्या 29 धावा
काय म्हणाले पार्थ जिंदाल?
दिल्लीचे मालक पार्थ जिंदाल यांनी EScricinfo ला सांगितले की, "कर्णधारपदाबद्दल चर्चा करणे थोडे लवकर होईल. अक्षर पटेल हा खूप वेळापासून संघाशी जोडला गेला आहे, गेल्या वेळी तो उपकर्णधारही होता. तो कर्णधार असेल की आणखी कोणी, हे आम्हाला माहीत नाही, अजून बरेच काही ठरायचे आहे. मी केएल राहुलशी बोललो पण त्याला भेटलो नाही. मी त्याला जवळून छान ओळखतो. तो कसा विचार करतो आणि कोचिंक ग्रुप काय करतो हे मला माहित आहे."
हे ही वाचा: IPL: आयपीएल सामना गमावल्यास मालकांचे किती नुकसान होते? जाणून घ्या
अक्षर पटेलचे केले कौतुक
अक्षर पटेलचे कौतुक करताना पार्थ जिंदाल म्हणाला, "अक्षर एक उत्कृष्ट खेळाडू आणि उत्कृष्ट टी-२० अष्टपैलू खेळाडू आहे. अक्षर आमच्यासाठी शानदार ठरला. उपकर्णधार म्हणून त्याने चांगले काम केले. जेव्हा पंत जखमी झाला आणि तो उपलब्ध नव्हता तेव्हा अक्षरने जबाबदारी स्वीकारली आणि मोठी भूमिका बजावली. तो एक आनंदी व्यक्ती आहे आणि ड्रेसिंग रूमचे वातावरण हलके ठेवतो."