Indian Premier League: इंडियन प्रीमियर लीग (IPL) ही जगातील सर्वात मोठी आणि प्रसिद्ध T20 क्रिकेट लीग आहे. या स्पर्धेत वेगवेगळे संघ असतात आणि ते खेळाडूंना विकत घेतात हे तर सगळ्यांनाच माहीत आहे. या स्पर्धेत सहभागी असलेल्या प्रत्येक संघामागे एक करोडपती मालक असतो. आयपीएलमधील प्रत्येक सामन्याला खूप महत्त्व असते आणि एक सामना हरणे हा संघासाठीच नव्हे तर मालकांसाठीही मोठा धक्का असतो. तुम्हाला कधी असा विचार पडला आहे का की एक सामना गमवल्यास मालक किती पैसे गमावतात? चला जाणून घेऊयात.
जर टीमने एकही सामना गमावला तर त्याच्या मालकांचे करोडो रुपयांचे नुकसान होऊ शकते. आयपीएलचा कोणताही संघ तयार करण्यासाठी त्याचे मालक प्रत्येक खेळाडूला करोडो आणि लाखो रुपयांना विकत घेतात. याशिवाय मॅचचे ब्रँडिंग आणि आयोजन करण्यात मोठा खर्च होतो. अशा परिस्थितीत एखादा संघ एकही सामना हरला तर त्याच्या मालकाचे मोठे नुकसान होते.
हे ही वाचा: IPL लिलावात नवऱ्याला खरेदी न केल्याने संतापली पत्नी, शाहरुखच्या टीमवर काढला राग!
आयपीएल संघांच्या मालकांना सामना गमावल्यानंतर त्यांना किती नुकसान होईल याचा एकदम अचूक अंदाज लावणे कठीण आहे. संघाच्या मालकाचे होणारे नुकसान हे विविध घटकांवर अवलंबून असते. पण जर आपण सामान्य अंदाजानुसार बोलायचे झाले तर, एक सामना गमावल्यानंतर, मालकांना 2 कोटी ते 10 कोटी रुपयांचे नुकसान होऊ शकते.
हे ही वाचा: तुमचा आवडता खेळाडू यंदा कोणत्या संघात? बघा IPL 2025चे संघ आणि खेळाडूंची यादी
आयपीएलचे पैसे मीडिया अधिकार, स्पॉनरशिप, तिकीट विक्री आणि मर्चंडाइज यासह अनेक स्त्रोतांकडून येतात. कोणत्याही आयपीएल सामन्याच्या टेलिव्हिजन आणि डिजिटल अधिकारांच्या लिलावात चांगली कमाई होते. याशिवाय वेगवेगळ्या कंपन्या आयपीएल संघ आणि सामन्याला स्पॉनरशिप देत असतात. यामुळे साहजिकच महसूल वाढतो. याशिवाय स्टेडियममध्ये पाहायला येणाऱ्या प्रेक्षकांचीसामन्यांची तिकिटे आणि संघाची जर्सी, बॅट, बॉल आदींची विक्री करूनही काही टक्के उत्पन्न मिळते.