मुंबई : काही दिवसांपूर्वी दिल्लीचे कोच रिकी पाँटिंग यांनी इतर टीमला इशारा दिला होता. आता दिल्लीचे टेन्शन कमी झालं आहे. दिल्ली टीमची सुरुवात यावेळी विशेष चांगली झाली नाही. मात्र आता धडाकेबाज खेळाडूंची एन्ट्री होणार आहे. त्यांच्या येण्यामुळे टीममध्ये मोठे बदल होऊ शकतात. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

दिल्ली टीमसाठी आनंदाची बातमी आहे. डेव्हिड वॉर्नर, एनरिक नॉर्खिया टीममध्ये खेळणार आहेत. दिल्लीचे सहाय्यक कोच शेन वॉटसन यांनी महत्त्वपूर्ण माहिती दिली. गुरुवारी लखनऊ विरुद्ध दिल्ली सामना होणार आहे. या सामन्यासाठी हे दोन्ही खेळाडू उपलब्ध असतील. या दोघांमुळे टीममधील कोणत्या दोन खेळाडूंना बाहेर बसवलं जाणार हे पाहावं लागणार आहे. 


शेन वॉट्सन यांनी दिलेल्या माहितीनुसार मिचेल मार्श टीममध्ये खेळेल की नाही याबाबत अजून शंका आहे. त्याला दुखापत झाली असून तो पूर्ण फिट नाही. त्यामुळे तो खेळेल की नाही याबाबत सध्या निश्चित काही सांगता येणार नाही.


दिल्ली टीमने मुंबई इंडियन्सचा 4 विकेट्सने पराभव केला होता. तर हार्दिक पांड्याची टीम गुजरातकडून दिल्लीला केवळ 14 धावांसाठी पराभवाचा सामना करावा लागला. पॉईंट टेबलमध्ये दिल्ली 7 व्या क्रमांकावर आहे. आता दिल्लीला लखनऊ विरुद्ध सामना जिंकणं गरजेचं आहे. तरच पॉईंट टेबलमध्ये दिल्लीला फायदा होऊ शकतो. 


दिल्ली टीममध्ये धुरंधर खेळाडूंची एन्ट्री झाली आहे. त्यामुळे ऋषभ पंत थोडा निर्धास्त झाला. कोलकाता विरुद्ध 7 एप्रिलला दिल्लीचा सामना आहे. या सामन्यात धुरंधर खेळाडू खेळताना दिसतील. 


गुजरातविरुद्ध सामन्यात दिल्लीला 14 धावांनी पराभव स्वीकारावा लागला. दिल्लीचा या मोसमातील हा पहिला पराभव आहे. हा सामना हरल्यानंतर दिल्लीचे कोच रिकी पाँटिंग नाराज होते. पुढच्याच सामन्यात पुन्हा नव्या ऊर्जेनं उतरू असा इशारा त्यांनी इतर टीमसाठी दिला.