RCB vs DC : सांगलीकर स्मृतीची चिवट झुंज, पण पराभवानंतर आता कसं असेल फायनलचं गणित?
RCB Women Vs DC Women : दिल्लीची लेडी सेहवाग म्हणजेच शेफाली वर्माच्या (Shafali Verma) तडाखेळाज अर्धशतकी खेळीला आरसीबीची कॅप्टन स्मृती मानधनाने (Smriti Mandhana) उत्तर दिलं.
WPL 2024 Final scenario For RCB W : महिला प्रीमियर लीग 2024 मधील 7 वा सामना रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि दिल्ली कॅपिटल्स (RCB Women Vs DC Women) यांच्यात खेळवला गेला. या सामन्यात दिल्लीने पुन्हा एकदा आरसीबीचा पराभव करत दुसरा विजय नोंदवला आहे. महिला प्रीमियर लीग इतिहासात एकदाही आरसीबीने दिल्लीला हरवलं नाही. याचीच पुनरावृत्ती आज झाल्याचं पहायला मिळालं. दिल्लीची लेडी सेहवाग म्हणजेच शेफाली वर्माच्या (Shafali Verma) तडाखेळाज अर्धशतकी खेळीला आरसीबीची कॅप्टन स्मृती मानधनाने उत्तर दिलं. मात्र, सांगलीकर स्मृतीची (Smriti Mandhana) झुंज अपयशी ठरली अन् दिल्लीने सामना 25 धावांनी खिशात घातला.
पाईंट्स टेबलचं कोणाची बाजी? (WPL points table)
आयसीबीच्या पराभवानंतर आता दिल्ली कॅपिटल्सने जोरदार मुसंडी मारली असून दिल्लीची संघ पहिल्या क्रमांकावर पोहोचला आहे. दिल्लीच्या खात्यात 4 अंक जमा झाले असून आरसीबी देखील दिल्लीला टक्कर देत आहे. आरसीबी आणि मुंबईच्या खात्यात 4-4 अंक आहेत. तर युपी वॉरियर्सला संघर्ष करावा लागणार आहे. युपीकडे सध्या एका विजयासह 2 अंक आहेत. तर गुजरातला एकही विजय मिळवता आला नाहीये.
आरसीबी फायनलमध्ये कशी पोहोचणार?
सर्व संघ प्रत्येकी 8 लीग सामने खेळतील. पॉईंट टेबलमध्ये अव्वल स्थानी असलेला संघ थेट अंतिम फेरीसाठी पात्र ठरेल, तर अंतिम फेरीत प्रवेश करण्यासाठी पॉईंट टेबलमध्ये दुसऱ्या आणि तिसऱ्या स्थानी असलेल्या संघांमध्ये एलिमिनेटर सामना खेळवला जाईल. त्यामुळे लीगमधील कमीत कमी सात सामने जिंकून फायनलमध्ये प्रवेश करण्याचा प्रयत्न आरसीबीचा असणार आहे. आता आरसीबीला फायनल गाठायची असेल तर उर्वरित 4 पैकी कमीतकमी 3 सामने जिंकावे लागणार आहेत.
दिल्ली कॅपिटल्स महिला संघ (प्लेइंग इलेव्हन): मेग लॅनिंग (कर्णधार), शफाली वर्मा, जेमिमाह रॉड्रिग्स, ॲलिस कॅप्सी, मारिझान कॅप, जेस जोनासेन, अरुंधती रेड्डी, मिन्नू मणी, तानिया भाटिया (विकेटकीपर), राधा यादव, शिखा पांडे.
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू महिला संघ (प्लेइंग इलेव्हन): स्मृती मानधना (कर्णधार), सोफी डेव्हाईन, सभिनेनी मेघना, नदिन डी क्लर्क, रिचा घोष (विकेटकीपर), जॉर्जिया वेरेहम, सोफी मोलिनक्स, श्रेयंका पाटील, सिमरन बहादूर, आशा शोभना, रेणुका ठाकूर सिंग.