नवी दिल्ली : दिल्ली उच्च न्यायालयाने राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते प्रफुल पटेल यांना जोरदार दणका दिलाय. अखिल भारतीय फुटबॉल महासंघाचे अध्यक्ष निवड रद्द केलेय.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

प्रफुल पटेल यांची अखिल भारतीय फुटबॉल महासंघाच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आली होती. दिल्ली उच्च न्यायालयाने दणका देताना दिल्ली उच्च न्यायालयाने माजी मुख्य निवडणुक आयुक्त एस. वाय. कुरेशी यांची फुटबॉल महासंघावर प्रशासक म्हणून नेमणूक केलेय.


अखिल भारतीय फुटबॉल महासंघाची नव्याने निवडणुकी घेण्यात याव्यात. ही निवडणूक ५ महिन्यांत घेण्याचे आदेश न्यायालयाने दिलेत. फुटबॉल महासंघाने घेतलेल्या निवडणुकांमधून राष्ट्रीय क्रीडा संहितेचे उल्लंघन झाल्याचे मत न्यायालयाने नोंदवले आहे.


२००९ मध्ये प्रफुल पटेल यांनी अखिल भारतीय फुटबॉल महासंघाच्या अध्यक्षपदाची सूत्रे स्विकारली होती. त्यानंतर आजपर्यंत प्रफुल पटेल फुटबॉल महासंघावर एकमताने निवडून येत आहेत. मागच्या वर्षी डिसेंबर महिन्यात फुटबॉल महासंघाच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत प्रफुल पटेल यांची एकमताने अध्यक्षपदी निवड झाली होती. पटेल यांच्या निवडीला राहुल  मेहरा यांनी दिल्ली उच्च न्यायालयात आव्हान दिले होते. आज दिल्ली उच्च न्यायालयाने निकाल देताना निवड चुकीची असल्याचे म्हटले होते.


मेहरा यांच्या याचिकेवर न्यायमूर्ती एस. रवींद्र भट आणि न्यायमूर्ती नजमी वझिरी यांच्या खंडपीठाने प्रफुल पटेल यांची निवड रद्द केली आहे.