मुंबईच्या निर्णायक मॅचमध्ये दिल्लीनं टॉस जिंकला
मुंबईच्या निर्णायक मॅचमध्ये दिल्लीनं टॉस जिंकला आहे.
नवी दिल्ली : मुंबईच्या निर्णायक मॅचमध्ये दिल्लीनं टॉस जिंकला आहे. दिल्लीचा कर्णधार श्रेयस अय्यरनं या मॅचमध्ये पहिले बॅटिंगचा निर्णय घेतला आहे. या मॅचमध्ये मुंबईच्या टीममध्ये एक बदल करण्यात आला आहे. फास्ट बॉलर मिचेल मॅकलेनघनच्या खांद्याला दुखापत झाली आहे. त्यामुळे मॅकलेनघनऐवजी मुस्तफिजुरला संधी देण्यात आली आहे. मुंबईनं यंदाच्या आयपीएलमध्ये १३ पैकी ६ मॅच जिंकल्यामुळे त्यांच्या खात्यात १२ पॉईंट्स आहेत. ही मॅच मुंबई जिंकली तर ते प्ले ऑफमध्ये क्वालिफाय होतील. याआधी हैदराबाद, चेन्नई आणि कोलकात्याच्या टीम प्ले ऑफमध्ये पोहोचल्या आहेत. दिल्लीची टीम याआधीच प्ले ऑफच्या शर्यतीतून बाहेर पडली आहे. दिल्लीनं १३ पैकी ४ मॅच जिंकत ८ पॉईंट्स कमावले आहेत. पॉईंट्स टेबलमध्ये दिल्लीची टीम शेवटच्या म्हणजेच आठव्या क्रमांकावर आहे.
मुंबईची टीम
सूर्यकुमार यादव, एव्हिन लुईस, इशान किशन, रोहित शर्मा, कृणाल पांड्या, कायरन पोलार्ड, हार्दिक पांड्या, बेन कटिंग, मयंक मार्कंडे, जसप्रीत बुमराह, मुस्तफिजुर रहमान
दिल्लीची टीम
पृथ्वी शॉ, श्रेयस अय्यर, रिषभ पंत, ग्लेन मॅक्सवेल, विजय शंकर, अभिषेक शर्मा, हर्षल पटेल, अमित मिश्रा, लियम प्लंकेट, संदीप लमीचाने, ट्रेन्ट बोल्ट